प्रतिनिधी – किशोर ठोसर
जनजाती सुरक्षा मंच पुणे ग्रामीण, पुणे महानगर, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे अत्याचाराला बळी पडलेल्या जनजाती समाजाच्या महिलेच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलन करून निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल येथील संदेशखाली येथे जनजाती समाजाची महिला अत्याचाराला बळी पडण्याची घटना उघडकीस आली आहे. असे असताना स्थानिक तृणमूल काँग्रेसच्या सरकारने या घटनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. देशातील सीमा भागातील जनजाती समाजावर वारंवार अत्याचार होत असल्याचे तसेच या अत्याचारांना बळी पडून जनजाती समाजाचे अतोनात नुकसान होत आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित आंदोलकांनी दिली. या निवेदनाद्वारे आंदोलकांवर कारवाई करून त्यांना कठोर शासन करावे त्याचबरोबर जनजाती समाजातील गोरगरीब नागरिकांच्या हडपलेल्या जमिनी त्वरित परत कराव्यात या मागणीचे निवेदन जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले. या आंदोलनावेळी पुणे ग्रामीण, पुणे महानगर आणि पिंपरी चिंचवड जनजाती सुरक्षा मंच यांच्या वतीने सुमारे साठहून अधिक आंदोलक आणि महिला आंदोलनकर्त्या या ठिकाणी उपस्थित होत्या.