घोडेगाव प्रतिनिधी – सुरंजन काळे
घोडेगाव चे ग्रामदैवत असणारे श्री राजा हरिश्चंद्र महादेव संस्थेला काही दिवसांपूर्वीच ‘क’ दर्जा प्राप्त झाला आहे घोडेगाव नगरीचे श्रध्दास्थान असणारे श्री राजा हरिश्चंद्र महादेवाचे पुरातन मंदिर आहे. यामध्ये प्रभू रामचंद्रांचे पूर्वज असलेले राजा हरिश्चंद्रची समाधी मंदिर आहे. मंदिरात प्राचीन शिवलिंग असून त्याची पूजा नित्यनेमाने केली जाते. संस्थेचे सद्यस्थितीला असणारे विश्वस्त हे ही उत्तम प्रकारे काम करत आहेत परंतु; काही रिक्त असलेल्या विश्वस्तांची निवड गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली होती त्या रिक्त पदांवर खालीलप्रमाणे नमूद नवनियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. कुंदन अजित काळे, रविंद्र दिगंबर कर्पे, प्रमोद झुंबरलाल गांधी, विजय महादेव घोडेकर, खंडू चिमाजी शेटे या मान्यवरांची निवड झाल्याचे देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत किसनराव काळे यांनी सांगितले. संस्थेचे कोषाअध्यक्ष राजेश काळे यांनी सर्व नवनिर्वाचित विश्वस्त यांचे सत्कार केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त सागर काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष प्रशांत किसनराव काळे यांनी आभार मानत असताना ज्येष्ठ मंडळींनी मार्गदर्शन करून तरुणांना संधी द्यावी असे मत मांडले.