प्रतिनिधि – सुरंजन काळे, घोडेगाव
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आदिवासी मंत्री यांच्याबरोबर चर्चा घडवून आणण्याचे ठरल्यामुळे रात्री अकरा वाजता स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया विद्यार्थी संघटनेचे आंदोलन मागे घेण्यात आले.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी एस एफ आय या संघटनेच्या वतीने प्रकल्प कार्यालय येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. काही राजकीय नेत्यांनी आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांचे विषयाला बगल देत स्वतःच्या विषयी घुसवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु विद्यार्थ्यांनी निवेदनातील विषयावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी सांगितले परंतु त्यांच्याकडे कुठल्याही प्रश्न सोडवण्याची क्षमता नसताना भाषण देण्याचे काम त्या ठिकाणी करत होते.
संघटनेचे कार्यकर्ते सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देण्यासाठी गेले असताना ते मुद्दे वाचल्यानंतर सांगितले होते की हे विषय स्थानिक पातळीवरचे नसून मंत्रालय पातळीवरचे आहेत, आपण मुंबईला यावे आदिवासी मंत्री महोदयांशी बैठक लावून आपण त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू.
रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेअंती सर्व विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मध्यस्थी करून आदिवासी मंत्री यांचे बरोबर बैठक लावल्यास आंदोलन पाठीमागे घेण्याचे ठरले त्याप्रमाणे संजय गवारी सभापती पंचायत समिती आंबेगाव, प्रकाश घोलप माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, किरण भालेकर साहेब पोलीस उपनिरीक्षक घोडेगाव प्रकल्प अधिकारी पाटील यांनी सहकार मंत्री वळसे पाटील यांच्याबरोबर फोनवर चर्चा करून आज दोन वाजता मुंबई मंत्रालय येथे आदिवासी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याबरोबर चर्चा करण्याचे ठरल्या वरती सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे ठरविले.
यावेळी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अमोल वाघमारे, SFI चे राज्याध्यक्ष सोमनाथ निर्मळ, समीर गारे, दीपक वाळकोळी आदि. कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.