भिमाशंकर प्रतिनिधी – किशोर ठोसर
राष्ट्रीय सांस्कृतिक संवर्धन समिति तसेच ग्रामपंचायत निगडाळे (भिमाशंकर) यांच्या संयुक्त विद्यमाने कोटेश्वर महादेव संस्थान किल्ले भोरगिरी ते भिमाशंकर कावड यात्रेचे आज दिनांक १३ ऑगस्ट २०२४ भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते.
श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकर येथे भिमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी श्रावणात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी उपस्थित राहतात.
शिव भक्तांनी १०१ भरण्यांची कावड यात्रा काढली. भाविकांनी भीमा नदीचे पाणी आणून महादेवाला जलाभिषेक केला. भिमाशंकर येथे सकाळीच कावड यात्रा भजनाच्या तालात दाखल झाली. या कावड यात्रेत भिमाशंकर, निगडाळे, तसेच पंचक्रोशीतील हजारो शिवभक्त सामील होऊन शिवनामाचा जयघोष केला. त्यामुळे, वातावरण भक्तिमय झाले होते. दरम्यान, पालखी कावडमध्ये शंकर-पार्वती, महादेव पिंड असा उत्कृष्ट देखावा केला होता. भिमाशंकर मधे पालखी दाखल होऊन मुख्य पायरी मार्गावरून जात पवित्र तीर्थाने देव-देवतांचा जलाभिषेक करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सांस्कृतिक संवर्धन समितिचे संस्थापक आर के शर्मा, संयोजक दत्तात्रय धोंडू हिले (सरपंच) , सुभाष लोहोकरे, शांताराम लोहोकरे, सह संयोजक किसन पारधी, सदस्य सुनील कपूर, कैलास गुप्ता, अविनाश शर्मा, संजय रजक, जयकेश दुबे, शांती देवी शर्मा गणेशनाथ महाराज व सकल हिंदु समाज यांच्यामार्फत कऱण्यात आले होते. या पालखी सोहळा मिरवणुकीमध्ये शिवभक्त, अबालवृद्धांसह महिला भगिणी आणि ईतर मान्यवर मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.