जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

मंचर येथील डोबीमळा येथे 19 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या.

हैदराबाद येथून आपल्या कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी मंचर येथे आलेले ननावरे कुटुंब या कुटुंबातील मोठा मुलगा श्रीकांत श्रीनिवास ननावरे 19 वर्ष राहणार मंचर मार्केटच्या मागे डोबी मळा. सदर श्रीकांत ननावरे हा विविध ठिकाणी बिगारी काम व गणपती रंगवण्याचे काम करत होता, तसेच ठेकेदार भीमा पाटलावत यांच्याकडे बिगारी काम करण्यास होता.

स्वराज्य संवाद प्रतिनिधी – मंचर

आज दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यान श्रीकांत ननावरे याचे आई वडील घरातील कामकाज उरकून श्रीकांतला सांगितले की, आम्ही कामावर जातो असे सांगून रोजंदारीने बिगारी काम करण्यासाठी भीमा ठेकेदार याचेकडे कामावर गेले होते. दरम्यान भीमा ठेकेदार यांनी श्रीकांत कामावर आला नाही असे त्याचे आई-वडिलांना विचारले असता आई-वडिलांनी सांगितले की तो घरी झोपला आहे.

त्यानंतर भीमा ठेकेदार हे श्रीकांत कामावर न आल्यामुळे विचारपूस करण्यासाठी १० च्या दरम्यान घरी गेले आणि त्याचे घराचा दरवाजा वाजवला आणि आवाज दिला तर त्याचा कोणताही प्रतिसाद भीमा यांना मिळाला नाही त्यामुळे कंटाळून भिमा पुन्हा मंचर मध्ये येऊन कामावर थांबले. त्यानंतर भीमा ठेकेदार पुन्हा एक वाजताचे दरम्यान श्रीकांत यांना उठवण्यासाठी व बोलण्यासाठी घरी गेले असता ननावरे याचे घराचा दरवाजा वाजवून व आवाज देऊन देखील उघडला नाही, त्यामुळे भीमा ठेकेदार यांना शंका आल्याने त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून घेतले आणि श्रीकांत हा दरवाजा उघडत नाही, तरी आपण त्याच्या आई वडिलांना फोन करून सांगू आणि हा दरवाजा तोडू असे सांगितले, त्यानंतर भीमा ठेकेदार व तेथील असणाऱ्या लोकांनी ननावरे यांच्या घराचा दरवाजा तोडला, आणि समोर पाहिले तर श्रीकांत ननावरे यांनी ओढणीच्या सह्याने पंख्याच्या अँगलला गळफास घेतल्याचे निदर्शनात आले.

त्यानंतर भीमा ठेकेदार यांनी श्रीकांत यांचे आई-वडिलांना फोन करून बोलावून घेतले तसेच त्यानंतर मंचर पोलीस स्टेशन येथे घडलेली घटना कळवली असता तात्काळ मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नंदकुमार आढारी आणि पोलीस कॉन्स्टेबल ढोबळे त्या ठिकाणी आले. आणि पोलिसांनी व तेथील असणाऱ्या लोकांनी श्रीकांत याला तात्काळ मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी श्रीकांत याला तपासले तर श्रीकांत याचा कोणताही प्रतिसाद डॉक्टरांना न मिळाल्याने डॉक्टरांनी श्रीकांत ननावरे हा मयत झाला असल्याचे सांगितले.

दरम्यान श्रीकांत ननवरे यांनी गळफास का घेतला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!