जाहिरात

ओट्यावर गाडी लावण्याचे कारणावरून चुलत चुलते व चुलतीने केली काठीने मारहान ❗ तिघांवर गुन्हा दाखल

काणसे शिनोली गावामध्ये गाडी ओट्यावर लावण्याचे कारणावरून चुलत चुलते व चुलती या तिघांनी शिवीगाळ, दमदाटी करून फिर्यादी ओम बाळासाहेब बोऱ्हाडे वय वर्ष 20 रा. कानसे शिनोली याला काठीच्या सहाय्याने मारहाण करून जखमी केल्याने तसेच त्याचे घराचा दरवाजा कु-हाडीने तोडल्याने त्याचे तक्रारीवरून आरोपी दशरथ सावळीराम बोऱ्हाडे, चंद्रकांत सावळेराम बोऱ्हाडे योगिता दशरथ बोऱ्हाडे यांच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 स्वराज्य संवाद प्रतिनिधी –  घोडेगाव

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी व आरोपी हे चुलत चुलते नातेवाईक असून त्यांच्यामध्ये जमिनीचे वाटपाचे वादविवाद चालू आहे मात्र दिनांक 06/08/2025 रोजी पावणे सात वाजताचे सुमारास फिर्यादी हे घरासमोर गाडी ओट्यावर लावत होते त्या दरम्यान त्यांचे चुलते दशरथ सावळेराम बोऱ्हाडे, चंद्रकांत सावळेराम बोऱ्हाडे व चुलत चुलती योगिता दशरथ बोऱ्हाडे हे त्या ठिकाणी आले, आणि गाडी लावण्याचे कारणावरून फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी करू लागले त्या दरम्यान आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये मोठा वाद-विवाद झाला या वाद विवादामध्ये आरोपी यांनी हातात आणलेल्या काठीने फिर्यादीस मारहाण केली त्यामुळे फिर्यादी याचे हाताला व पायाला दुखापत झाली, तसेच जवळ असणाऱ्या कु-हाडीने घराच्या दरवाजावर मारून दरवाज्याचे नुकसान केले.

त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत फिर्यादी हे घोडेगाव येथील पोलीस ठाण्यात आले असता पोलिसांनी त्यांना प्रथम उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय घोडेगाव या ठिकाणी नातेवाईकांसोबत पाठवले, मात्र मारहाण झालेल्या फिर्यादी याला घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी पुढील औषधोपचारासाठी वायसीएम हॉस्पिटल पुणे या ठिकाणी पाठवले.

तरी फिर्यादी यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर सदर फिर्यादी ओम हे घोडेगाव पोलीस स्टेशन मध्ये आले आणि घडलेल्या  घटनेबाबत तक्रार देऊन घोडेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तरी सदर घटनेचा तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवींद्र सुरकुले हे करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!