जाहिरात

घरातच जुगार नावाचा तीन पत्ती खेळ खेळत असताना सापळा रचून पाच जणांवर पोलिसांचा छापा ❗ गुन्हा दाखल

नांदूर ता. आंबेगाव जि. पुणे रामवाडी गावचे हद्दीतीत दुपारी अडीच वाजता च्या दरम्यान मंचर पोलीस पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती नुसार जनाजी रामचंद्र चिखले यांच्या घरामध्ये बेकायदेशीर रित्या पाच जण पत्ते खेळत असताना टाकला छापा यामध्ये नितीन मारुती चिखले, गणेश ज्ञानेश्वर चिखले, प्रशांत चंद्रकांत ढगे, प्रशांत जनाजी चिखले, कचरू किसन नेमाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 स्वराज्य संवाद प्रतिनिधी – मंचर

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 06/08/2025 रोजी मौजे नांदूर गावचे हद्दीत मंचर पोलीस दुपारी अडीच वाजता पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कळंब ते महाळुंगे पडवळ कडे जाणारे रोडचे कडेला रामवाडी गावचे हद्दीत जनाजी रामचंद्र चिखले यांचे घरामध्ये काही लोक एकत्रित बसून तीन पत्ती नावाचा जुगार खेळ खेळत आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नलावडे यांना मिळाली.

 त्यानंतर सदर घटना गांभीर्याने लक्षात घेता त्या ठिकाणी पोलीस व पंच यांना बोलावून घेतले सदर तीन पत्ती खेळत असणारे घरामध्ये लोकांवर छापा टाकण्याचे नियोजन करण्यात आले. तदनंतर सर्व पोलीस स्टाफ व पंच गाडी घेऊन चिखले यांचे राहते घराचे समोर गेले आणि त्या ठिकाणी गाडी लावली, आणि गाडीतून खाली उतरून त्यांचे घराच्या आत मध्ये चालत गेले असता घराचे आतील खोलीमध्ये पाच इसम त्यांच्या हातामध्ये पत्ते घेऊन पैशावर तीन पत्ते नावाचा जुगार खेळत असताना दिसले पोलिसांनी लागलीच तात्काळ छापा टाकून आणि सर्वांना रंगेहात पकडले, त्यामध्ये आरोपींकडून रोख रक्कम पंधराशे रुपये आणि जुगाराचे साहित्य पंचा समक्ष जप्त करण्यात आले.

तरी वरील पाच आरोपी यांच्यावर तीन पत्ती नावाचा जुगार बेकायदा बिगर परवाना खेळत असताना मिळून आल्याने मुंबई जुगार कायदा कलम 12 अ प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत कंकाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नंदकुमार आढारी व त्यांचे सहकारी करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!