
आंबेगाव तालुक्यातील कोटमदरा या गावच्या हद्दीत डोंगरावर एका तरुण व्यक्तीने नाईट पॅन्टला असणाऱ्या नाडीच्या सहाय्याने गळफास घेतले असल्याचे त्या ठिकाणी शेळ्या चारण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचे आले निदर्शनात.
स्वराज्य संवाद – ज्ञानेश्वर खिरड
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव हद्दीतील कोटमदरा या ठिकाणी असणाऱ्या डोंगरावर शेतकरी सुनील भांगे हा सकाळी ११:०० ते ११:३० वाजायचे दरम्यान शेळ्या चारण्यासाठी गेला असता त्याला त्या ठिकाणी एका तरुण व्यक्तीने फाशी घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर सुनील भांगे यांनी गावचे पोलीस पाटील सुनिल डामसे यांना फोन केला आणि सदर घटना सांगितली, त्यानंतर पोलीस पाटील डामसे हे घटनास्थळी गेले आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहिल्यानंतर तेथे एका अज्ञात तरुणाने फाशी घेतल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर पोलीस पाटील डामसे यांनी घोडेगाव पोलीस स्टेशन यांच्याशी फोन द्वारे संपर्क करून कोटमदरा गावचे हद्दीत उंच डोंगरावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फाशी घेतल्याचे कळविले.

त्यानंतर घोडेगाव पोलीस ठाण्याचे पी.एस.आय महेश पवार व त्यांचे सहकारी तसेच आपदा मित्र, रेस्क्यू टीम आणि गावातील काही लोक डोंगरावर पोचले. सदर तरुणाने नाईट पॅंटीच्या नाड्याचे सहाय्याने फाशी घेतल्याचे निदर्शनात आले, त्यानंतर फाशी घेतलेल्या ठिकाणी पोलिसांनी आजूबाजूला जवळ पास शोधा – शोध केली असता काहीही मिळून आले नाही, मात्र सदर फाशी घेतलेल्या तरुणाच्या खिशात दुचाकी गाडीची चावी मिळून आली.
त्यानंतर आपदा मित्र, रेस्क्यू टीम तसेच पोलीस आणि गावातील लोकांच्या मदतीने सदर फाशी घेतलेल्या तरुणाची दुचाकी शोधली असता, सदरची दुचाकी ही पळस्टिका फाटा अनाथ मुलांचे आश्रम या परिसरात मिळून आली सदर दुचाकी ही पल्सर असून तिचा नंबर MH 12 ND 8431 असा आहे, तर सदर दुचाकी ही पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.

तर सदर फाशी घेतलेल्या तरुणाला डोंगरावरून कापडी स्ट्रेचरवर ठेऊन सर्वांनी खाली आणले आणि त्या ठिकाणी तात्काळ उपस्थित झालेल्या देवेंद्रशेठ शहा फाउंडेशन या रुग्णवाहिकेतुन शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
दरम्यान सदर तरुणाचे जवळ त्याचे नावाचा कोणताही पुरावा नसल्यामुळे फाशी घेणाऱ्या तरुणाचे नाव पत्ता मिळून आला नाही. तरी सदर तरुणाने फाशी का घेतली याचे अद्याप कारण समजले नाही. तरी सदर पुढील घटनेचा तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

व्हिडिओ बातम्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या यु ट्युब तसेच फेसबुक या चिन्हावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.


