
पुणे जिल्ह्यात ठीक ठिकाणी मध्यरात्रीपासून संततधार पाऊस चालू असल्याने आंबेगाव तालुक्यातील मौजे पहाडदारा येथील ठाकरवस्ती या ठिकाणी सकाळी नऊ ते दहा वाजायचे सुमारास बबन सखाराम कडाळे, बायजाबाई बबन कडाळे, रवींद्र बबन कडाळे व आरती बबन कडाळे यांचे राहते घर हे अतिवृष्टीमुळे जमीन खचून पडल्याची घटना घडली आहे.
स्वराज्य संवाद – ज्ञानेश्वर खिरड
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आंबेगाव तालुक्यात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस चालू असून विविध भागात अतिवृष्टी सारखे परिसर तयार झालेले आहेत. त्यातच आज दिनांक १५/०९/२०२५ रोजी सकाळी नऊ ते दहा वाजायचे सुमारास मौजे पहाडदरा येथील ठाकरवाडी वस्तीवर ४० बाय १६ या पत्र्याच्या घरामध्ये राहणारे बबन सखाराम कडाळे, बायजाबाई बबन कडाळे, रविंद्र बबन कडाळे व आरती रवींद्र कडाळे हे घराच्या बाहेर सकाळी घरगुती कामे करत होते, तर रवींद्र कडाळे यांना श्रावणी वय वर्ष सात सुवर्णा वय वर्ष 5 या दोन मुली असून आर्यन वय वर्ष दीड हा लहान मुलगा आहे.

सकाळी झोपेतून उठल्यानंतर श्रावणी वय ७ वर्षे ही मुलगी घरामध्ये तिचा लहान भाऊ आर्यन कडाळे वय वर्ष दीड याच्यासोबत घरामध्येच होती. सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास घरामध्ये चुलीवर आंघोळीचे पाणी तापत असताना, जमीन खचून घराची भिंत आणि पत्रे खाली पडल्यामुळे चुलीवरील गरम पाणी हे दीड वर्षाच्या आर्यन या बाळाच्या पायाखाली गेल्यामुळे डाव्या बाजूने मांडीला भाजले आहे, तर इयत्ता पहिलीत शिकत असणारी श्रावणी ही कपाटाखाली अडकली होती. घराच्या बाहेर असणाऱ्या आरती कडाळे यांना देखील दुखापत झाली तर सदरची घटना घडल्यानंतर कडाळे कुटुंबांनी आणि शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी श्रावणी आणि आर्यन या लहान बाळाला त्या पडलेल्या घरातून बाहेर काढले आणि त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र पहाडदरा येथे उपचारासाठी नेले त्यांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

तर कडाळे यांचे राहते घर खचून घराचे नुकसान झाले आहे, त्यामध्ये जीवांनाआवश्यक वापरायच्या असणाऱ्या वस्तू देखील काही प्रमाणात खाली गाडल्या गेल्या आहेत तर धान्य देखील भिंत पडल्यामुळे गाडले गेले आहे भांड्यांची देखील फोडतोड होऊन चेंबले आहेत.तर इयत्ता पहिलीत शिकत असणारी श्रावणी आणि अंगणवाडीत शिकत असणारी सुवर्णा या मुलींचे दप्तर, वह्या पुस्तके, शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्या घराखाली गाडले गेले आहेत.दरम्यान सदर घडलेल्या घटनेमध्ये कोणतीही मोठी जीवित हानी झाली नाही मात्र कडाळे यांचे संसार उपयोगी सर्व वस्तू घराखाली गाडल्या गेल्या आहेत.
सदरची घटना घडल्याचे कळताच गावचे पोलीस पाटील निलेश भालेराव, गावचे सरपंच मच्छिंद्र वाघ, उपसरपंच कैलास वाघ यांनी पारगाव पोलिसांची संपर्क करून लागलीच पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे व त्यांच्यासह इतर पोलीस त्या ठिकाणी आले आणि पाहणी करून पुढील कारवाई चालू केली.
तसेच आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक गावचे मंडळ अधिकारी सुरेश तळपे यांच्या मार्गदर्शनाखाली पहाडदरा गावचे ग्राम महसूल अधिकारी ऋतुराज रवींद्र ढवळे ग्राम महसूल सहाय्यक गणपत भंडारकर, मदतनीस साहिल शितोळे यांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे.
सदर घडलेल्या घटनेबाबत तात्काळ ग्रामपंचायतचे सदस्य संकेत वायकर, पोलीस पाटील निलेश भालेराव व स्थानिक मदत करणारे यांनी त्या कडाळे कुटुंबास जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या तर गावचे सरपंच मच्छिंद्र वाघ यांनी सदर घडलेल्या घटनेच्या बाजूच्या जागेत ताडपत्रीने पॅक बंद असे राहण्याची व्यवस्था करून दिली.

दरम्यान घडलेल्या घटनेमध्ये त्या गरीब कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूची मदत करण्याचे आव्हान करण्यात येत आहे.
व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी 👇🏻👇🏻


