जाहिरात

आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची दीपावली होणार गोड ❗भीमाशंकर मार्फत सभासद आणि ऊस उत्पादकांना गावोगावी होणार साखर वाटप

पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा.ना. दिलीपराव वळसेपाटील यांचे मार्गदर्शनानुसार सभासद व ऊस उत्पादकांना प्रतिवर्षाप्रमाणे दिपावली निमित्त गाव आणि गटवार साखर वाटपाचे नियोजन केले आहे.

स्वराज्य संवाद प्रतिनिधी – दिपली खिरड

मिळालेल्या माहिती नुसार शनिवार दि. ४ ऑक्टोबर ते रविवार दि. १२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत रु. २०/- प्रति किलो दराने गावोगावी साखर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली आहे.

तर सभासद व ऊस उत्पादकांना भविष्याचा विचार करता तसेच आधुनिक प्रणालीचा वापर करून स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले आहे. नियोजीत साखर वाटप तारखेला फक्त स्मार्ट कार्डद्वारेच साखर वाटप करण्यात येणार असल्याने सभासद व ऊस उत्पादकांनी दिलेली स्मार्ट कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.

दरम्यान चालू वर्षी साखरेचे वाटप कारखान्याचे भागधारक व गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये ऊस पुरविलेला आहे यांचेसाठी राहील. त्यामध्ये १) रु. १०,०००/- त्यापुढील भाग रक्कम व ऊस उत्पादक – ८० किलो, २) फक्त भागधारक अथवा फक्त ऊस उत्पादक – ६० किलो, ३) भागासाठी रु. १०,०००/- पेक्षा कमी जमा रक्कम तसेच ऊस नाही ५० किलो याप्रमाणे खालील तारखेनुसार विभागीय शेतकी गटांतर्गत गावोगावी १०, २० व ५० किलो पॅकींगमध्ये साखर वाटपाचे नियोजन केलेले आहे.

कोणत्या गावांमध्ये किती तारखेला केली जाणार साखर वाटप

शनिवार दि. ४ – पारगाव गटातील गावे.

रविवार दि. ५ – पारगाव गाव, निरगुडसर व जांबूत गटातील गावे.

सोमवार दि. ६ – निरगुडसर व पिंपरखेड गाव, कळंब व रांजणी गटातील गावे.

मंगळवार दि. ७ –  मंचर गटातील गावे.

बुधवार दि. ८ – मंचर व अवसरी खुर्द गाव व घोडेगाव गटातील गावे.

गुरुवार दि. ९ – टाकळी हाजी व कवठे गटातील गावे.

शुक्रवार दि. १० – टाकळी हाजी व कवठे गाव, करंदी, जातेगाव गटातील गावे.

शनिवार दि. ११ – करंदी व जातेगाव गाव, भोरवाडी, निमगाव सावा, नारायणगाव, ओझर गटातील गावे.

रविवार दि. १२ – भोरवाडी, निमगाव सावा, नारायणगाव, खेड गटातील गावे.

जे सभासद  तसेच ऊस उत्पादक वरील नियोजीत कालावधीत आप आपले गावामधून साखर घेवू शकणार नाहीत त्यांना साखर सोमवार दि. १३ ऑक्टोबर ते सोमवार दि. २० ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये (साप्ताहिक सुट्टी गुरुवार सोडून) कारखाना साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत वाटप केली जाणार आहे. त्याशिवाय राहिलेल्या सभासद व ऊस उत्पादकांना सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी कारखाना साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साखर वाटप करण्यात येणार आहे.

तसेच गर्दी कमी करण्यासाठी गावोगावी साखर वाटपाचे प्रमाण विचारात घेवून काही गावांमध्ये सलग २ दिवस वाटपाचे नियोजन केले असून सभासद व ऊस उत्पादकांनी साखर घेवून जाणेचे सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसेपाटील यांनी केले.

व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.👇🏻👇

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!