जाहिरात

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन व गव्हाण पूजन समारंभ संपन्न

दत्तात्रय नगर पारगाव (ता . आंबेगाव ) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन व गव्हाण पूजन समारंभ राज्याचे माजी गृहमंत्री व कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले .


यावेळी आंबेगाव शिरूर वारकरी संप्रदायातील संत महंत व ह भ प महाराजांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पूर्वाताई वळसे पाटील तसेच शिरूर चे माजी आमदार पोपटराव गावडे,कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, व्हा. चेअरमन प्रदीप वळसे पाटील आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, मानसिंग पाचुंदकर, प्रकाश पवार, शिवाजीराव ढोबळे, अरुण गिरे, रवींद्र करंजखिले, युवराज बाणखेले, अमोल जगताप सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे सेक्रेटरी रामनाथ हिंगे चिफ अकौंटट राजेश वाकचौरे टेक्निकल मॅनेजर शिरीष सुर्वे, पाॉडक्शन मॅनेजर किशोर तिजारे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले.

यावेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले मराठवाडा सोलापूर व सर्वच महाराष्ट्रात पूरस्थिती भयंकर आहे या पूरग्रस्त झालेल्या नागरिकांना कारखान्यांनी शेतकऱ्यांनी व आंबेगाव शिरूर तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त मदत करावी असेही आवाहन केले त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात एआय तंत्रज्ञान वापर करून एकरी १०० टन ऊस उत्पादन वाढवावे व जास्तीत जास्त ऊस पिकवावा असेही आवाहन केले यावेळी ह भ प गणेश महाराज शिंदे ह भ प राजाराम महाराज जाधव ह भ प नवनाथ माशेरे महाराज यांनीही आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाला खेड आंबेगाव शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने हजर होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!