जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

इन्स्टाग्रामला पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याचे कारणावरून एकास मारहाण…..❓ पुणे जिल्ह्यातील घटना…❗

चार पाच दिवसापूर्वी इन्स्टाग्राम ला पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याचे कारणावरून चिडुन जावुन शिनगारवाडी गावाजवळील म्हसे बु. येथील खाडे वस्तीवरील अमर मुंजाळ रा डोंगरगण याने त्याचे सोबत हर्षद खाडे, करण चव्हाण दोघे रा. म्हसे बु.व सचिन पवार (पत्ता माहित नाही.) यांनी येवुन लाकडी दांडक्यांनी, हाताने व लाथाबुक्क्यांनी मला हातावर, तोंडावर व डोक्यात मारहाण केल्याची घटना घडली असून रोहन मळीभाऊ खामकर रा. शिनगारवाडी ता. शिरूर जि.पुणे. याचे तक्रारी नुसार शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वराज्य संवाद – शिरूर

या घटनेची मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी खामकर हे मामा सागर ज्ञानदेव टिळेकर यांचे शिरूर येथे फॅब्रीकेशनचे दुकान असुन मामांकडे काम करत होतो, मात्र साधारणः चार ते पाच दिवसापुर्वी इन्स्टाग्रामवर गावाजवळील म्हसे बु. येथील खाडे वस्तीवरील अमर मुंजाळ याने फिर्यादी  खामकर याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती मात्र ती फिर्यादी यांनी स्वीकारली नव्हती. तर दोन तीन दिवस गेल्यानंतर दि. 30/09/2025 रोजी फिर्यादी खामकर हे सकाळी 11.00 वा. सुमारास डोंगरगण फाटा येथील सोनदिल चोरे यांचे हॉटेल स्वरा येथे फॅब्रीकेशनचे काम करण्यासाठी खामकर गेला होता.

त्यावेळी त्या ठिकाणी हॉटेलमध्ये अमर मुंजाळ व त्याचे सोबत हर्षद खाडे हे आले आणि फिर्यादीकडे दोन तीन वेळा पाहून गेले मात्र फिर्यादी हा कामामध्ये असल्यामुळे त्यांचेकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर फिर्यादी हे दुपारी ०२ : ०० वाजायचे सुमारास हॉटेलमध्ये जेवण करून बसलेले असताना त्या ठिकाणी पुन्हा अमर मुंजाळ व हर्षद खाडे हे आले आणि त्यांनी फिर्यादीकडे पाहुन हातातील दांडक्यानी फिर्यादीस मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी खामकर त्या ठिकाणाहून पळत सुटला आणि आरोपी मुंजाळ व खाडे फिर्यादीच्या मागे पळत आले.

त्यावेळी फिर्यादी हा रस्त्याकडे पळाला व पुन्हा पळत हॉटेलचे आवारामध्ये आला असताना तेथे सचिन पवार हा पळत आला व त्याने फिर्यादीला ढकलुन दिले फिर्यादी हा खाली पडला त्यावेळी सचिन पवार याने तोंडावर व छातीवर हाताने मारहाण केली त्यानंतर त्या ठिकाणी करण चव्हाण हा त्याचेकडील मोटार सायकल नं. एमएच 12 व्ही वाय 2348 वर आला व त्याने त्याचेसोबत असणारे अमर मुंजाळ व हर्षद खाडे यांनी फिर्यादीस पुन्हा त्यांचेकडील लाकडी दांडक्याने हातावर व डोक्यात मारहाण केली त्यावेळी भांडणे पाहून हॉटेल मालक सोदनिल व त्याचा भाउ स्वप्नील हा भांडणे सोडविण्यासाठी आला असता त्या ठिकाणाहुन सर्वजण पळून गेले. फिर्यादी यांना भांडणामध्ये मार लागल्याने गावातील प्रज्वल याला फोन करून मारहाण झाल्याचे सांगितल्याने प्रज्वल तसेच त्याचेसोबत माझे चुलते आणि मामा आले त्यांनतर फिर्यादी हे टाकळी हाजी पोलीस चौकीला गेले. सदर घडलेली संपूर्ण घटना शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांना सांगण्यात आली त्यानंतर सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिरूर पोलीस ठाण्यात सदर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा तपास सहाय्यक फौजदार गायकवाड हे करत आहेत.

दरम्यान तरुणांनी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियाचा वापर योग्य कामासाठी करावा, तसेच पालकांनी देखील आपला पाल्य सोशल मीडियातून गुन्हेगारी वृत्तीकडे ओळत तर नाही ना ❓ याकडे देखील लक्ष देण्याचे आवाहन प्रमोद हरिभाऊ बाणखेले भाजपा जिल्हाध्यक्ष उद्योग आघाडी उत्तर पुणे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!