जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

१० हजार रुपयांच्या वादातून वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला; आंबेगाव तालुक्यातील घटना

उधारीचे १० हजार रुपये परत न केल्याच्या रागातून एका ५६ वर्षीय वृद्ध महिलेवर लाकडी काठीने जबर मारहाण करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आंबेगाव तालुक्यातील नानवडे येथे घडली आहे. या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वराज्य संवाद प्रतिनिधीविश्वजित गवारी

घटनेचा तपशील
याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी मंगल विलास भोकटे रा. आसाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची आई लीलाबाई चिंधू वडेकर या नानवडे येथे राहतात. ३० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास, आरोपी रामचंद्र गणपत मसळे (रा. महाळुंगे तर्फे आंबेगाव) हा लीलाबाई वडेकर यांच्या घरासमोर आला. आरोपीने लीलाबाईं वडेकर यांचेकडे त्याने दिलेल्या १० हजार रुपयांची मागणी केली. “तू माझे घेतलेले पैसे आताच्या आता दे, नाहीतर तुला आणि तुझ्या नवऱ्याला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत त्याने हातातील लाकडी काठीने लीलाबाईं वडेकर यांच्या तोंडावर, पाठीवर आणि डाव्या कानफडावर जबर मारहाण केली. या हल्ल्यात लीलाबाई वडेकर या जागीच बेशुद्ध होऊन पडल्या.

उपचार आणि पोलीस कारवाई
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी जखमी लीलाबाईं वडेकर यांना तातडीने रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय, तिरपाड येथे नेले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी घोडेगाव आणि मंचर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पिंपरी-चिंचवड येथील वाय.सी.एम. (YCM) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

घोडेगाव पोलिसांनी या प्रकरणी आरोपी रामचंद्र मसळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२ च्या कलम ११८(१) (धोकादायक शस्त्राने गंभीर दुखापत करणे), ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) आणि १०९ (हत्येचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सागर भगवान पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!