1782234614371

घोडेगावच्या गौरी काळेचा राज्यात 15 वा क्रमांक ❗ न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या 10 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत नोंद

आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, घोडेगाव येथील विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. नुकतीच जाहीर झालेल्या राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत शाळेतील एकूण 10 विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे. यामध्ये कु. गौरी युवराज काळे हिने राज्य गुणवत्ता यादीत 15 वे स्थान पटकावून शाळेचा गौरव वाढवला आहे.

प्रतिनिधी – सुरंजन काळे, घोडेगाव

राज्य शासनामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये घोडेगावच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली.

इयत्ता 5 वीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील 5 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले. त्यात कु.अनन्या योगेश वाघमारे J-36, कु. मृणाल विजय गेंगजे J-493, कु. प्रिसिला प्रवीण नायकोडी J-537, कु. तनिष्का बाळासाहेब घोडेकर J-636 आणि कु. भार्गवी भरत थोरात J-637 यांचा समावेश आहे.

इयत्ता 8 वीच्या परीक्षेत देखील 4 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. त्यामध्ये कु. गौरी सचिन घटे J-37, कु. श्रीशिल काशिनाथ करके J-94, कु. यशराज लक्ष्मण पोटे D-3 आणि कु. विश्वराज विनोद काळे A-1 यांचा समावेश आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या आदर्श प्राचार्या श्रीमती मेरी फ्लोरा डिसूझा, उपप्राचार्या रेखा आवारी, पर्यवेक्षिका सौ. वंदना वायकर तसेच शिक्षिका सौ. सोनीका नायकोडी, सौ. प्रज्ञा घोडेकर, श्रीमती सुप्रिया मंडलिक, सौ. सुषमा फलके, सौ. स्मिता पवळे, श्री. संतान आसंगी आणि श्री. चेतन पोखरकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. तुकाराम नामदेवराव काळे, उपाध्यक्ष अॅड. संजय दत्तात्रय आर्वीकर, कार्याध्यक्ष श्री. सुरेश शेठ गजानन शेठ काळे, मानद सचिव श्री. विश्वासराव अरविंद काळे, सहसचिव श्री. प्रशांत बाळासाहेब काळे, समन्वय समिती चेअरमन श्री. राजेश कैलास शेठ काळे, खजिनदार श्री. सोमनाथ वसंत काळे, वसतिगृह कमिटीचे चेअरमन सूर्यकांत गांधी, महाविद्यालयाचे चेअरमन अँड. श्री. मुकुंद भगवंतराव काळे, संचालक श्री. अक्षय रामशेठ काळे, श्री. वैभव बबनराव काळे, श्री. अजित दत्तात्रय काळे आणि विद्यालयाचे चेअरमन श्री. बाळासाहेब काशिनाथ काळे यांनी अभिनंदन केले.

यावेळी बोलताना अध्यक्ष श्री. तुकाराम काळे म्हणाले, “स्पर्धा परीक्षेत यशासाठी परिश्रम, जिद्द आणि सातत्याने अभ्यास गरजेचा आहे. आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी अखंड प्रयत्न केले तरच असे यश मिळते. यापुढेही अधिक विद्यार्थ्यांनी अशा परीक्षांमध्ये भाग घेऊन शाळेचे नाव उज्ज्वल करावे.”

ग्रामीण भागातील इंग्लिश मीडियम शाळेने गुणवत्ता यादीत केलेली ही कामगिरी परिसरातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Most Popular

Recent Comments