जाहिरात गवारी

भीमाशंकर कारखान्याकडून सभासद व ऊस उत्पादकांना दिवाळी साखर वाटप; २ ऑक्टोबरपासून गावोगावी नियोजन

पारगाव ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार, सभासद व ऊस उत्पादकांना प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त गाव व गटवार साखर वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. २ ऑक्टोबर ते शनिवार दि. १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत रु. २०/- प्रति किलो दराने गावोगावी साखरेचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मा.श्री. बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

प्रतिनिधी – दिपाली खिरड

कारखान्याने मागील वर्षी सभासदांसाठी विभागीय शेतकी कार्यालयामध्ये स्मार्ट साखर कार्डचे वाटप केले आहे. तसेच, हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस पुरवठा केलेल्या उत्पादकांसाठी साखर कार्ड वाटपाचे काम संबंधित विभागीय शेतकी गट ऑफिसमध्ये सध्या सुरू आहे. नियोजित तारखेला साखर घेताना सभासद आणि ऊस उत्पादकांनी त्यांना दिलेले स्मार्ट कार्ड व ओळखीचा पुरावा सोबत आणणे बंधनकारक आहे. हे वाटप कारखान्याचे भागधारक आणि गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस पुरविलेल्या शेतकऱ्यांसाठीच असेल. साखरेचे वाटप १०, २० आणि ५० किलोच्या पॅकिंगमध्ये केले जाईल.

कोणाला किती साखर मिळणार? (पात्रतेनुसार वर्गीकरण):

पूर्ण शेअर्स (रु. १५,०००/-) व ऊस पुरवठा केलेले: ८० किलो साखर

फक्त पूर्ण शेअर्स (रु. १५,०००/-) असलेले: ५० किलो साखर1

अपूर्ण शेअर्स रक्कम व ऊस पुरवठा केलेले: ४० किलो साखर

फक्त ऊस पुरवठा केलेले: ४० किलो साखर

फक्त अपूर्ण शेअर्स रक्कम जमा केलेले: ३० किलो साखर विभागीय शेतकी गटनिहाय साखर वाटपाचे सविस्तर वेळापत्रक: दि. २ ऑक्टोबर (शुक्रवार): पारगाव गटातील सर्व गावे.दि. ३ ऑक्टोबर (शनिवार): पारगाव गाव, निरगुडसर व जांबूत गटातील सर्व गावे.दि. ४ ऑक्टोबर (रविवार): निरगुडसर गाव, कळंब व रांजणी गटातील सर्व गावे.दि. ५ ऑक्टोबर (सोमवार): मंचर गटातील सर्व गावे.दि. ६ ऑक्टोबर (मंगळवार): मंचर व अवसरी खुर्द गाव आणि घोडेगाव गटातील सर्व गावे.दि. ७ ऑक्टोबर (बुधवार): टाकळी हाजी, कवठे व करंदी गटातील सर्व गावे.दि. ८ ऑक्टोबर (गुरुवार): करंदी गटातील गावांसाठी गट ऑफिस.दि. ९ ऑक्टोबर (शुक्रवार): जातेगाव, भोरवाडी, निमगाव सावा, नारायणगाव गट, ओझर, उंब्रज या गटातील गावांसाठी गट ऑफिस येथे; तसेच खोडद व पारगाव (मंगरूळ) गाव येथे.दि. १० ऑक्टोबर (शनिवार): जातेगाव बु., भोरवाडी, निमगाव सावा, नारायणगाव अंतर्गत संबंधित साखर वाटप गावांसाठी गट ऑफिस येथे आणि खेड गटातील गावांसाठी मार्केट यार्ड खेड येथे.

मुदत संपल्यास कारखाना साईटवर मिळणार साखर:

जे सभासद किंवा ऊस उत्पादक वरील नियोजित कालावधीत आपापल्या गावातून साखर घेऊ शकणार नाहीत, त्यांना रविवार दि. ११ ऑक्टोबर ते बुधवार दि. १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कारखाना साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साखर दिली जाईल.

त्यानंतरही उर्वरित राहिलेल्या सभासदांना सप्टेंबर २०२७ पर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी कारखाना साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साखर वाटप उपलब्ध राहील. तरी सर्व पात्र सभासद आणि ऊस उत्पादकांनी वरील नमूद तारखेला उपस्थित राहून आपली साखर घेऊन जावी व सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा. श्री. प्रदीप वळसे पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Most Popular

Recent Comments