
सोसायटीचे सभासद कर्जदार 1) गोरक्ष बबन पोखकर 2) दत्तात्रय नाथा नरवडे 3) रतन देवजी वाळुंज यांनी श्री गडदादेवी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादीत पोंदेवाडी ता आंबेगाव जि पुणे येथील सचिव शंकर महादेव लबडे व सहसचिव संदेश जयसिंग पोंदे यांचेकडे रक्कम दिली मात्र सचिव लबडे,सहसचिव पोंदे यांनी संगणमत करून रक्कम भरले बाबत सभासद कर्जदार यांना श्री गडदादेवी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादीत पोंदेवाडी ता आंबेगाव जि पुणे यांचे लेटर पॅडवर कर्ज बाकी नसल्याचा दाखला देवुन कर्जदार यांचेकडून घेतलेले कर्जाची रोख रक्कम बँकेत किंव्हा संस्थेत न भरता स्वतःचे आर्थिक फादयाकरीता वापरून शेतकऱ्यांचा, सोसायटी व पदाचा गैरवापर करून विश्वासघात केल्यामुळे फिर्यादी विवेक कैलास वाघमारे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आंबेगाव कार्यालय मंचर,मुख्य लिपीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शंकर महादेव लबडे व संदेश जयसिंग पोंदे यांचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – पारगाव कारखाना
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी हे दिनाक 10 जुलै 2023 पासुन सहाय्यक निबंधक कार्यालय आंबेगाव, मंचर येथे मुख्य लिपीक या पदावर काम करीत आहेत. तरी सहाय्यक निबंधक कार्यालय आंबेगाव या कार्यालयात मौजे पोंदेवाडी ता आंबेगाव जि पुणे येथील 1) गोरक्ष बबन पोखकर 2) दत्तात्रय नाथा नरवडे 3) रतन देवजी वाळुंज यांनी लेखी तक्रारी अर्ज दिले की, श्री गडदादेवी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादीत पोंदेवाडी या सोसायटीचे आम्ही सभासद असुन आम्ही सोसायटीकडुन नियमित कर्ज घेवुन पुन्हा भरत असतो. आम्ही कर्ज भरणा करताना आमची नावे असलेली रक्कम आम्ही सोसायटीचे सचिव लबडे व पोंदे यांचेकडे देवुन भरणा केला होता. सदर रक्कम भरले बाबत सचिव लबडे व पोंदे यांनी आम्हाला श्री गडदादेवी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादीत पोंदेवाडी ता आंबेगाव जि पुणे यांचे लेटर पॅडवर कर्ज बाकी नसल्याचा दाखला दिला.त्यानंतर सचिव लबडे व सहसचिव पोंदे यांनी बँकेत, संस्थेत आमचे कडुन घेतलेल्या रोख रक्कमेचा भरणा केला नसल्यामुळे, 1) गोरक्ष बबन पोखकर 2) दत्तात्रय नाथा नरवडे 3) रतन देवजी वाळुंज यांना थकबाकीची नोटीस न देता सहाय्यक निबंधक आंबेगाव यांचेकडे सहकार कायदा कलम 101 चे प्रकरण दाखल केले. सदर प्रकरणाचा निकाल लागुन त्यानुसार बँकेने सदर जमीनीवर जप्तीचा आदेश केला आमचे सातबारा सदरी नोंद आदेशाची झालेली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी तक्रारी अर्ज केले नंतर फिर्यादी कडे केलेल्या अर्जावरून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आंबेगाव कार्यालय मंचर या ठिकाणी सुनावणी होवुन या तक्रारी अर्जावरून सचिव लबडे सहसचिव पोंदे यांनी शेतकऱ्यांची, संस्थेची, शासनाची फसणुक केल्याचे निदर्शनास आले त्यानुसार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आंबेगाव यांनी सचिव लबडे सहसचिव पोंदे यांना लेखी पत्र दिले की 1) गोरक्ष बबन पोखकर रा पोंदेवाडी ता आंबेगाव जि पुणे यांचे नावे असलेले कर्ज 67,500/-रु. 2) दत्तात्रय नाथा नरवडे रा पोंदेवाडी ता आंबेगाव जि पुणे यांचे नावे असलेले कर्ज 2,90,700/-रु. 3) रतन देवजी वाळुंज रा पोंदेवाडी ता आंबेगाव जि पुणे यांचे नावे असलेले कर्ज 1,71,928/- एकूण 5,30,128/- ही कर्ज रक्कम व त्यावरील व्याज हे 10/03/2025 रोजी पत्र देवून तात्काळ भरणेस सांगितले असता त्यांनी आद्याप पर्यत वरील रक्कम व त्यावरील व्याज बँकेत अगर संस्थेत न भरल्यामुळे शेतकऱ्यांची, संस्थेची, शासनाची विश्वासघात करून फसवणुक केली आहे.
त्यानुसार फिर्यादी यांनी पारगाव कारखाना पोलीस ठाणे याठिकाणी तक्रार दिली असून गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे यांचे मार्गदर्शनाखाली होत आहे.


