जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

दोन लाख द्या पाच कोटींचा रुपयांचा पाऊस पाडून देतो आदेश महाराजासह साथीदारांना ठोकल्या बेड्या ❗गुन्हा दाखल

वडापाव व ज्यूस विकणाऱ्या महिलेशी व तिच्या पतीशी ओळख करून त्यांना विश्वासात घेऊन, आमच्याकडे असणाऱ्या बाबाकडून विद्येच्या जोरावर तुम्हाला पैशाचा पाऊस पाडायचा असेल तर तुम्ही आम्हाला दोन लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला दोन लाखाचे पाच करोड रुपये करून देतो. असे सांगितले व दोन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे समजले असता फिर्यादी ओव्हाळ यांनी ओतूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली त्यानुसार 1) आदेश महाराज (पूर्ण नाव माहित नाही) रा. ओतूर, 2) अरूण लिखरे मुकणे रा.वसद शेलवली, अंबरनाथ, ता. कल्याण जि. ठाणे, 3) गणेश वाघ रा. ओतूर, 4) गौरव विश्वास शिंदे रा. निमगाव सावा, ता. जुन्नर जि. पुणे, 5) राजेंद्र प‌द्माकर भले रा. मोरोशी ता. मुरबाड जि. ठाणे, 6) रशिद अहमद शेख बळेगाव टोकावडे ता. मुरबाड जि. ठाणे, 7) गुरूनाथ गंगाराम वाघ रा. खरोड, अंबरनाथ ता. कल्याण जि. ठाणे अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.

स्वराज्य संवाद प्रतिनिधी – ओतूर

याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, मागील चार महिन्यापूर्वी फिर्यादीचे नातेवाईकाच्या घरी बदलापूर या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम असल्यामुळे फिर्यादी त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी आरोपी अरुण मुकणे हा देखील आला होता त्यांनी फिर्यादीची ओळख करून घेतली त्यानंतर तो फिर्यादी यांचेशी फोनवर बोलू लागला, मात्र मे महिन्यात मुकणे हे फोनवर बोलत असताना फिर्यादी यांना सांगितले की खुबी ता. जुन्नर जि. पुणे येथे आदेश महाराज असून विद्येच्या जोरावर पाऊस पडतात त्यांनी आमचे समोर अशी बरीच कामे केली आहेत, फिर्यादीने याकडे दुर्लक्ष केले मात्र आरोपी मुकणे हा वारंवार फिर्यादी यांना फोन करून माझ्या ओळखीच्या महाराजांकडून तुम्ही देखील पैशाचा पाऊस पाडून फायदा करून घ्या असे वेळोवेळी सांगत होता. मात्र फिर्यादीने कामाच्या व्यापामुळे आरोपीच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. मात्र आरोपी मुकणे यांनी फिर्यादी यांना आदेश महाराजांचा व त्या ठिकाणी असणाऱ्या गणेश वाघ यांचा मोबाईल नंबर दिला व त्यांना फोन करण्यास सांगितले, त्यानंतर फिर्यादी यांनी फोन केला असता आरोपींनी सांगितले की आम्ही बऱ्याच लोकांची कामे केली आहेत.

तर तुम्हाला पैशाचा पाऊस पडायचा असेल तर तुम्ही दोन लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला दोन लाखाचे पाच करोड रुपये करून देतो, असे आरोपीने फिर्यादी यास फोनवर सांगितल्याने फिर्यादीने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला व आरोपींनी सांगितले प्रमाणे दोन लाख रुपये जमा करण्यासाठी फिर्यादीने स्वतःचे गळ्यातील सोन्याचे दागिने सोनाराचे दुकानात मोडून आणि पतीचे कंपनीतून मिळालेले पैसे तसेच बचत केलेले पैसे असे सर्व मिळून दोन लाख रुपये जमा केले. त्यानंतर फिर्यादीने आरोपींना पैसे जमा झाले बाबत सांगितले असता आरोपी आदेश महाराज यांनी फिर्यादी यांना फोन करून सांगितले की तुम्ही तुमचे पैसे घेऊन अमावस्येच्या दिवशी खुभी येथे या मी तुम्हाला तुमचे पैशाचे काम करून देतो.

त्यानंतर दिनांक 20/5/2025 रोजी संध्याकाळी साडेसात वाजताचे सुमारास फिर्यादी व त्यांचे पती दोघेजण जमा केलेले दोन लाख रुपये घेऊन मोटरसायकवरून खुबी ता. जुन्नर येथे गेले त्यावेळी आरोपी आदेश महाराज हे फिर्यादी येण्याची वाट पाहत रस्त्याच्या कडेला थांबले होते. त्यानंतर आरोपी व फिर्यादी यांची भेट झाल्यानंतर आरोपींनी खुबी गावच्या खाली भांगले वस्ती कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने हायवे रोड पासून काही अंतरावर बंद असलेल्या पत्रा शेड जवळ नेले आणि मोकळ्या मैदानात पैसे घेऊन बसण्यास सांगितले.

त्यानंतर आरोपी आदेश महाराज यांनी त्यांच्यासोबत असणाऱ्या रिकाम्या बॅगमध्ये तांदूळ हळदी कुंकू टाकून फिर्यादी यांना डोळे बंद करून शांत बसण्यास सांगितले, तर थोड्यावेळाने डोळे उघडण्यास सांगितले फिर्यादी यांनी डोळे उघडले त्यावेळेस महाराजांनी आणलेली रिकामी बॅग नोटांनी भरलेली फिर्यादीस दाखविली. तर फिर्यादीच्या हातात पाचशे रुपयांचे दोन बंडल देऊन नोटा खरे आहेत की खोटे आहेत तपासून पहा असे देखील सांगितले, तर नोटा खरे असल्याचे फिर्यादी यांना जाणवले.

तर आरोपी महाराजांनी पुन्हा फिर्यादी यांना डोळे बंद करण्यास सांगितले, आणि थोड्या वेळाने पुन्हा डोळे उघडण्यास सांगितले असता महाराजांनी आणलेली बॅग एका धाग्याने बांधलेली फिर्यादी यांना दिसली, त्यानंतर महाराजांनी फिर्यादी यांना ती धाग्याने बांधलेली बॅग फिर्यादी यांच्याकडे दिली आणि तुमचे काम झाले आहे, तुम्ही आनलेले दोन लाख रुपये मला द्या असे सांगून दोन लाख रुपये घेतले त्यानंतर फिर्यादी यांना सदर धागे बांधलेली बॅग घेऊन जाण्यास सांगितले तसेच जाताना मागे पाहिचे नाही, घरी गेल्यावर तीन दिवसांनी बॅग उघडा तोपर्यंत बॅगेला हात लावू नका या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी हे सदर ठिकाणाहून आपले राहते घरी निघून आले. त्यानंतर मात्र फिर्यादी यांनी आरोपी आदेश  महारज फोन करण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद येत होता म्हणून दिलेली बॅग उघडली तेव्हा त्या बॅगमध्ये पैसे नसून बॅगमध्ये पेपर रद्दीच्या घड्या असल्याचे दिसले.

त्यानंतर फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आपल्या जवळचा ओळखीचा निलेश खापरे यांना सर्व हकीगत सांगितली त्यानंतर संपूर्ण घटनेची शहानिशा करून पूर्णपणे प्लान तयार करून खापरे यांनी आरोपी मुकणे यांना फोन केला आणि आम्हाला पण पैशाचा पाऊस पाडायचा आहे, याबाबत विचारणा केली त्यानंतर आरोपी मुकणे आणि आदेश महाराज यांनी एक मेकांशी चर्चा केली आणि त्यांना देखील दोन लाख रुपये घेऊन या पैशाचा पाऊस पाडून देतो असे सांगितले लागलीच खापरे हे दिनांक 1/8/2025 रोजी सकाळी आकरा वाजता खुबी येथे भांगले वस्ती जवळ असणारे पत्र्याचे शेड जवळ खापरे व त्यांचा मित्र संकेत भंगाळे, तसेच फिर्यादी देखील सोबत गेले.

आदेश महाराज व मुकणे यांचा विधी चालू असतानाच फिर्यादी यांनी तात्काळ ओतूर पोलीस स्टेशन गाठले आणि झालेली सर्व हकीगत सांगितली त्यानंतर ओतूर पोलिसांनी सदर घटनेची दखल घेत घटनास्थळी पोहोचले असता त्या ठिकाणी आदेश महाराजांचा विधी चालू होता तेच सर्वांना रंगेहात पकडले असून अटक केले आहे. सदर आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 3(5), 316 (2), 318 (4), 61(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान सर्व आरोपींना आज रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साो., जुन्नर न्यायालय यांचे समक्ष हजर करणेत आले असता सदर आरोपींची ३ दिवस पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. सदरची कारवाई मा. श्री. संदिपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक साो., पुणे ग्रामीण, श्री. रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक साो., पुणे ग्रामीण, श्री. रवींद्र चौधर, उपविभागीय पोलीस अधिकारी साो. जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ओतुर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. लहु थाटे, पो.हवा. नामदेव बांबळे, भरत सुर्यवंशी, नदिम तडवी, शंकर कोबल, पो. कॉ. रोहीत बोंबले, अमोल शिंदे, संतोष भोसले, आशिष जगताप, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पुणे ग्रामीण चे सहा. फौजदार दिपक साबळे, पो. हवा. अक्षय नवले यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!