
मंचर नगरपंचायतच्या शेजारी असणाऱ्या नंदिनी बिअरबारच्या आवारात धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना दि. ०२/०८/२०२५ रोजी रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान घडली आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव प्रशांत रवींद्र गांजाळे वय 45 वर्षे, रा. एस कॉर्नर, मंचर तालुका आंबेगाव जि. पुणे असे आहे.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – मंचर
प्राथमिक मिळालेली माहिती अशी की, सदरची घटना ही पैशाच्या देवाण-घेवाणीवरून झाली असल्याचे समजत आहे. शहाजी वामन इंदोरे, सचिन सुदाम इंदोरे, प्रतीक शिवाजी इंदोरे सर्व रा. चांडोली खुर्द ता.आंबेगाव, जि. पुणे यांनी मयत प्रशांत गांजाळे याला नंदिनी बियरबार जवळ बोलवले तर गांजाळे हा त्याच्या दुचाकीवरून नंदिनी बिअरबार समोर आले व दुचाकी बियरबारच्या समोर लावली आणि बिअरबारच्या दरवाजातच पैशाच्या देवाण-घेवाणीवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला सदरचा वाद इतका विकोपाला गेला की, शहाजी इंदोरे याच्यासोबत असणाऱ्या सचिन सुदाम इंदोरे व प्रतीक शिवाजी इंदोरे या साथीदारांनी गांजाळे याला नंदिनी बियरबारच्या दरवाजातच धरले आणि शहाजी इंदोरे याच्याकडे असणाऱ्या धार – धार शस्त्राच्या सहाय्याने गांजाळे याच्या मानेवर, घशावर वार केले आणि तो नंदिनी बियरबारच्या दरवाजत, आवारात खाली पाडला त्यांच्या मानेतून रक्तप्रवाह खूप होत होता, तर खून करणारा आरोपी शहाजी इंदोरे व त्याचे साथीदार सचिन इंदोरे व प्रतिक इंदोरे हे त्या ठिकाणाहून पळून गेले, तर स्थानिकांनी प्रशांत गांजाळे याला मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सदर खुणाची घटना घडल्याचे कळताच मंचर पोलीसांचे पथक नंदिनी बियरबारच्या दरवाज्यात, आवारात आले असता त्यावेळेस पोलिसांना त्या ठिकाणी रक्ताचा सडा असल्याचे दिसले, त्यानंतर तेथील असणाऱ्या लोकांकडून घटनेची माहिती घेऊन मंचर पोलीस ग्रामीण रुग्णालयात गेले.
सदर घटनेची गांभीर्याने दखल घेत मंचर पोलिसांनी एक तासाच्या आत सापळा रचून खून करणारा आरोपी शहाजी इंदोरे व त्याचे साथीदार सचिन सुदाम इंदोरे, प्रतीक शिवाजी इंदोरे सर्व रा. चांडोली खुर्द ता. आंबेगाव जि. पुणे यांना अवसरी खुर्द येथून शोधून तात्काळ ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सदर गुन्ह्याची चौकशी सुरू आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक सो श्री संदिप गिल्ल, मा. अपर पोलीस अधिक्षक साो, श्री रमेश चोपडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो श्री अमोल मांडवे, मा. पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सुनिल बडगूजर, पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे, पोलीस उपनिरीक्षक यशवत यादव, सहा. पोलीस निरीक्षक राजेश नलावडे, सहा. पोलीस निरीक्षक गणपत डावखर, पोलीस हवालदार नंदकुमार आढारी, पोलीस हवालदार संजय नाडेकर, पोलीस हवालदार सुदाम घोडे, पोलीस हवालदार हगवणे, पोलीस अंमलदार योगेश रोडे, अविनाश दळवी, हनूमंत ढोबळे यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर हे करीत आहेत.


