जाहिरात

सर्व शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाकडून महत्वाच्या सूचना

महाराष्ट्र राज्य महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी दिनांक १ ऑगस्ट २०२५ ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सुरु राहणार असल्याचे जाहीर केले आहे.

स्वराज्य संवाद – ज्ञानेश्वर खिरड

सदर ई-पीक पाहणी DCS मोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे ७/१२ उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू केली आहे. सध्या खरीप हंगामातील पीक पाहणीची कार्यवाही सुरू आहे. तर खरीप हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणी DCS मोबाईल अ‍ॅपचे व्हर्जन 4.0.0 अद्ययावत स्वरूपात गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अ‍ॅप अपडेट करुन घ्यावे. असे आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी सांगितले आहे.

तरी सर्व शेतकरी बांधवांना महसूल विभागाकडून आवाहन करण्यात येते की, खरीप २०२५ ची पीक पाहणी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करावी.

सर्व शेतकरी बांधवांनी आप आपल्या मालकीच्या शेतजमिनींमध्ये खरीप म्हणजे पावसाळी हंगामात जी काही पिके घेतली आहेत त्यांची नोंदणी आपल्या ७/१२ वर दिलेल्या मुदतीत करुन घ्यावी.

सलग ३ हंगाम म्हणजे खरीप हंगाम (पावसाळी), रब्बी हंगाम (हिवाळी) व उन्हाळी हंगामामध्ये जर आपले ७/१२ उतारावरील वरील पिकपाहणी हे सदर कोरे राहिले तर तिथे “कायमपड” दाखल अशी नोंद दाखल होईल.

  • जर शेतकऱ्यांनी ७/१२ सदरी पिक पाहणी नोंद केली नाहीतर होणारे नुकसान.

१) कोणत्याही प्रकारचे शासकीय पिककर्ज, अल्प व दिर्घ मुदत कर्ज मिळणार नाही.

२) कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही.

३) पिकविमा मिळणार नाही.

४) नैसर्गिक आपत्ती मध्ये आपल्या पिकांचे, शेतजमिनीचे नुकसान झाल्यास कायमपड लागल्याने ती पंचनामा व नुकसानभरपाई देण्यास पात्र ठरत नाही. त्यामुळे आपले म्हणने त्यावेळी कोणी ऐकून घेणार नाहीत.

५) ई-पिकपाहणी केल्याशिवाय तलाठी कार्यालयातून कोणत्याही प्रकारचे दाखले व उतारे मिळणार नाहीत.

त्यामुळे वरील सर्व गैरसोयी टाळण्यासाठी मुदत संपण्यापूर्वी पिक पाहणी करुन घ्यावी. मुदत संपल्यानंतर परत पिकपाहणी करता येत नाही. त्यामुळे आपण वरील सुचनांचा विचार करुन लवकरात लवकर पिकपाहणी करुन घ्यावी.

ई-पिक पाहणी अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!