
श्रावणी महिन्याचा तिसरा सोमवार असल्याकारणाने पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाईट पापळवाडी परिसरातून 30 ते 35 महिला पिकअप गाडीत श्री कुंडेश्वर येथे देव दर्शनास जात असताना पाईट गावच्या हद्दीत पिकअप सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळून झाला मोठा अपघात.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी खेड
याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रावणी महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी पाईट पापळवाडी तालुका खेड परिसरातून अंदाजे ३० ते ३५ महिलांनी श्री कुंडेश्वर येथे देवदर्शन करण्यासाठी पिकअप गाडीने जाण्यासाठी नियोजन केले होते.
पिकअप गाडी ही घाटातून नागमोडी वळणे असल्यामुळे वर चढत असताना अचानक मागे आली आणि पाच ते सहा पलट्या खात खोल दरीत कोसळली. हा अपघात इतका मोठा झाला की, पिकअप मध्ये बसलेल्या अंदाजे २५ ते ३० महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. तर तीन ते चार महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस आणि महाळुंगे पोलीस ठाण्यातील पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले तर त्या ठिकाणी असणाऱ्या रुग्णवाहिका देखील उपलब्ध झाल्या.
तर जखमी झालेल्या भाविकांना पाईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पोखरकर हॉस्पिटल खेड, गावडे हॉस्पिटल, शिवतीर्थ हॉस्पिटल, केअर वेल हॉस्पिटल चाकण, बांबळे हॉस्पिटल साईनाथ हॉस्पिटल भोसरी, साळुंखे हॉस्पिटल खेड या सर्व रुग्णालयांमध्ये सुमारे दहा ते बारा रुग्णवाहिका मधून उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सदर रस्ता नागमोडी वळण आणि घाट रस्त्यावर असल्यामुळे तसेच वाहनाचा वेग आणि रस्त्याच्या परिस्थितीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान दोन वर्षांपूर्वी शिरोली गावाजवळ एक मोठा अपघात झाला होता, या अपघातात ५ महिलांचा मृत्यू आणि १३ जण जखमी झाल्याचे परिसरातील रहिवासी सांगत होते, तर या भागातील रस्त्यांच्या सुरक्षिततेवर स्थानिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

श्री कुंडेश्वर येथे जात असताना झालेल्या अपघातात जखमी झालेले वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्यांची नावे
बांबळे हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेले जखमींची नावे – कविता सारंग चोरगे, सुलाबाई बाळासाहेब चोरगे, सिद्धीकार रामदास चोरगे, छबाबाई निवृत्ती पापळ,
गावडे हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या जखमींची नावे शकुंतला चोरगे, मनीषा दरेकर
पोखरकर हॉस्पिटल खेड येथे उपचार घेत असलेल्या जखमींची नावे – लताताई करंडे, ऋतुराज कोतवाल, ऋषिकेश करंडे, निकिता पापळ, जयश्री पापळ.
केअर वेल हॉस्पिटल चाकण येथे उपचार घेत असलेल्या जखमींचे नाव – सिद्धी ज्ञानेश्वर पापळ
साळुंखे हॉस्पिटल खेड येथे उपचार घेत असलेल्या जखमींची नावे – चित्रा शरद करंडे, चंद्रभागा दत्तात्रय दरेकर, मंदा चांगदेव पापळ.
शिवतीर्थ हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेत असलेले जखमींची नावे – लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर कलाबाई मल्हारी लोंढे, जनाबाई करंडे, फसाबाई सावंत, सुप्रिया लोंढे, निशांत लोंढे
साईनाथ हॉस्पिटल भोसरी येथे उपचार घेत असलेल्या जखमींची नावे सुलोचना कोळेकर, मंगल शरद दरेकर, पुनम वनाजी पापळ, जाईबाई वनाजी पापळ.
तर पाईट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जखमींनी घेतलेले उपचार यांची नावे – अलका शिवाजी चोरगे, रंजना दत्तात्रय कोळेकर, मालुबाई लक्ष्मण चोरगे, जया बाळू दरेकर.
प्राथमिक माहिती मिळता या अपघातात ८ मयत झाले आहेत त्यांची नावे –
शोभा ज्ञानेश्वर पापळ, सुमन काळूराम पापळ, शारदा रामदास चोरगे, मंदा कानिफ दरेकर, संजीवनी कैलास दरेकर, मिराबाई संभाजी चोरगे, बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर, शकुंतला तानाजी चोरघे.
दरम्यान सदर घडलेल्या अपघातामुळे पाईट पापळवाडी या ठिकाणी हळहळ व्यक्त केली जात आहे.


