जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

पत्रकार प्रमोद दांगट यांच्या वडिलांचे दुःखद निधन ; बुधवार दिनांक १३ रोजी दशक्रिया विधी कार्यक्रम

निरगुडसर ता. आंबेगाव येथील प्रसिद्ध वखार व्यावसायिक, शेतकरी बबनराव नामदेव दांगट ( वय वर्षे ५६ ) यांचे दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम बुधवार दिनांक १३/८/२०२५ रोजी सकाळी साडेसात वाजता निरगुडसर तालुका आंबेगाव येथील घोडनदीच्या पवित्र तीरावर संपन्न होणार आहे. दशक्रिया विधी कार्यक्रमानिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प अश्विनीताई महाराज टाव्हरे यांचे प्रवचन संपन्न होणार आहे. कैलासवासी बबनराव दांगट हे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात लाकडाचे व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी, तीन मुले , एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध पत्रकार प्रमोद दांगट, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत दांगट व सामाजिक कार्यकर्ते राहुल दांगट यांचे ते वडील होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!