जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

मंचर येथील बस स्टॅंडवर एस टीत चढत असताना महिलेच्या पर्सची चैन खोलून सोन्याचे मिनी गंठण नेले चोरून

मंचर ता.आंबेगाव येथील बस स्टॉप वर गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या पर्सची चैन खोलून ८० हजार रुपये किमतीचे ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत मंचर पोलीस ठाण्यात फिर्यादी विठ्ठल शंकर पोखरकर रा. पिंपळगाव खडकी यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

स्वराज्य संवाद प्रतिनिधी – मंचर

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, दिनांक ११/०८/२०२५ रोजी सकाळी १०:३० वाजताचे सुमारास खडकी पिंपळगाव वरून फिर्यादी व त्यांची पत्नी हे नाशिक या ठिकाणी वैयक्तिक कामानिमित्त निघाले होते.

तर मंचर बस स्टॅंडवर फिर्यादी व त्यांची पत्नी हे नाशिककडे जाणाऱ्या एसटीची वाट पाहत उभे होते तर काही वेळातच नाशिककडे जाणारी एसटी बस त्या ठिकाणी आली आणि त्या एस टी बस मध्ये चढत असताना त्या ठिकाणी असणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पोखरकर यांच्या पत्नीचे हातातील लेडीज पर्सची चैन खोलून सदर पर्स मधून ९ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे मिनी गंठण चोरून नेले.

सदर पोखरकर यांना पर्सची चैन उघडी असल्याचे निदर्शनात आल्यानंतर पर्समध्ये सर्व वस्तू उचकून पाहिले असता त्यामध्ये सोन्याचे मिनी गंठण दिसून आले नाही, त्यानंतर फिर्यादी पोखरकर यांनी बस स्टॅन्डवर आजूबाजूला चौकशी केली असता सदर चोरी गेलेल्या सोन्याचे गंठणची त्या ठिकाणी कोणाला माहिती नसल्याचे कळाले.

तदनंतर मात्र फिर्यादी पोखरकर व त्यांच्या पत्नी चित्रा पोखरकर यांनी मंचर पोलीस स्टेशन येथे धाव घेतली आणि सर्व घडलेली घटना पोलिसांना सांगितली, त्यानंतर मंचर पोलिसांचे पथक तात्काळ बस स्टॉप वर आले आणि घडलेल्या घटनेच्या ठिकाणी आजूबाजूला चौकशी केली, तर घडलेल्या घटनेचा पोखरकर यांचे तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करणात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुमित मोरे व त्यांचे सहकारी करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!