जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

अष्टविनायक हायवेवर सैने कवठे या गावचे हद्दीत अपघात, ६ वर्षाच्या लहान मुलासह आजी आणि वडिलांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सैने कवठे गावच्या हद्दीत अष्टविनायक महामार्गावर बंटी ढाबा हॉटेलच्या चौकात तांदूळ भरलेली आईसर ट्रक गाडीला मागून येणाऱ्या कन्हैया दूध वाहतूक करणाऱ्या आईसर ट्रक गाडीने जोरदार धडक देऊन मोठा अपघात झाला आहे.

स्वराज्य संवाद प्रतिनिधी – मंचर

याबाबत प्राथमिक मिळालेली माहिती अशी की, दि.१७/०८/२०२५ रोजी ज्ञानेश्वर मकाजी वाजे वय ३७ वर्षे, युवांश ज्ञानेश्वर वाजे वय ६ वर्षे, शांताबाई मकाजी वाजे वय ६० वर्षे, मूळ रा. वडनेर बुद्रुक ता.पारनेर, सद्या रा. मुंबई हे त्यांचे रक्ताचे नात्यातील, कुटुंबातील बायजाबाई कान्हू शेटे यांचे प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्राद्ध) रविवार दिनांक १७/०८/२०२५ रोजीचे या कार्यक्रमासाठी मुंबईवरून गावी येत असताना अष्टविनायक महामार्गावर सैने कवठे ता.शिरूर या गावचे हद्दीत बंटी ढाबा हॉटेलच्या चौकात सकाळी ५ ते ५: ३० दरम्यान अपघात होऊन मृत्युमुखी झाले आहेत. वडनेर बुद्रुक ता.पारनेर या गावावर शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.

सदर ज्ञानेश्वर वाजे शांताबाई वाजे आणि युवांश वाजे हे कन्हैया दूध मालवाहतूक करणारी आयशर कंपनीची गाडी नंबर एम एच १६ सी डी ९८१९ या दूध वाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये गावी येत असताना पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसले होते.

सदर गाडी ही सैने कवठे गावच्या हद्दीत बंटी ढाबा हॉटेलच्या चौकात हायवे रस्ता हा चढउताराचा असल्याने, कन्हैया दूध मालवाहतूक करणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला त्याच्यासमोर रस्त्याच्या बाजूला जागेवरच उभी असलेली दुसरी गाडी नं. एम एच ४२ बी ८८६६ हि तांदूळ मालवाहतूक करणारी आयशर ट्रक या गाडीला मागून जाऊन धडक दिल्यामुळे मोठा अपघात झाला. तांदळाची मालवाहतूक गाडीतील चालक हा बाथरूमला जायचे म्हणून गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून गेला होता. मात्र मागून येणारे कन्हैया दूध मालवाहतूक गाडीतील वाहन चालकाला पुढे उभे असलेल्या तांदळाने भरलेल्या आयशर ट्रक या गाडीला मागून जोरदार धडक दिली, आणि अपघात झाला.

या अपघातामध्ये युवांश ज्ञानेश्वर वाजे वय वर्षे ६, या लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर ज्ञानेश्वर मकाजी वाजे वय वर्ष ३७ यांना पारगाव कारखाना या ठिकाणी प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. मात्र जखमीची अवस्था पाहता त्यांना पुढील उपचारासाठी साईनाथ हॉस्पिटल भोसरी या ठिकाणी घुले रुग्णवाहिकेमधून घेऊन जात असताना पेठ व खेड गावच्या हद्दीतील घाटामध्ये ज्ञानेश्वर वाजे यांचा मृत्यू झाला त्यामुळे वडील व मुलाला मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले, सदर घटना कळताच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार लक्ष्मण उंडे यांनी सदर घटनेचा पंचनामा करून शिरूर पोलीस स्टेशनला माहिती पाठविली.

तर शांताबाई वाजे यांना रुग्णवाहिकेमधून साईनाथ हॉस्पिटल भोसरी या ठिकाणी दाखल करण्यात आले, मात्र त्याठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा देखील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. सदर अपघात झाल्यानंतर कन्हैया दूध या मालवाहतूक ट्रकचा चालक हा त्याच्या गाडीतील जखमींना उपचारासाठी घेऊन न जाता तसेच पोलिसांना कोणतीही माहिती न देता पळून गेला असल्याचे स्थानिकांचे सांगण्यातून येत आहे. तसेच तांदूळ वाहतूक करणारा दुसऱ्या आयशर गाडीचा चालक देखील फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान सदर अपघाताची माहिती कळताच शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अनिल आगलावे तसेच त्यांचे सहकारी घटनास्थळी येऊन सदर अपघाताचा पुढील तपास चालू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!