जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

रात्री बाथरूमसाठी उठुन दरवाजा बंद न करता तो तसाच उघडा ठेवुन झोपले, मात्र उघड्‌या दरवाजावाटे दोन चोरट्यांनी घरामध्ये केला प्रवेश…..

मौजे विश्वासरावमळा साकोरी तर्फे बेल्हे ता. जुन्नर जि. पुणे येथे राहणारे खंडु रभाजी विश्वासराव हे रात्री बाथरूमसाठी उठुन दरवाजा बंद न करता तो तसाच उघडा ठेवुन झोपलेले असतांना त्या उघड्‌या दरवाजावाटे दोन अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाट उघडण्याचा प्रयत्न करीत असतांना आवाज झाल्याने तक्रारदार फिर्यादी प्रियांका संदेश हाडवळे यांना जागी आली असता आराडा ओरडा केले नंतर घरातील आजीचे कानातील व बाळाचे पायातील पैंजण चोरट्यांने ओरबाडून पळ काढून चोरून नेले त्यावरून आळेफाटा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे.

स्वराज्य संवाद प्रतिनिधी – आळेफाटा

मिळालेली सविस्तर माहिती अशी की, दिनांक 17/08/2025 रोजी पहाटे 03/00 वा. चे सुमारास फिर्यादी घरामध्ये झोपलेली असतांना घरातील कपाटाचा आवाज झाल्याने फिर्यादी हाडवळे झोपेतुन जागे झाले असता त्यांना घरातील कपाटाजवळ दोन लोक दिसले. त्यावेळी हाडवळे यांनी आजीला उठविले असता ते दोघेजण फिर्यादी व आजीकडे आले तर फिर्यादी यांनी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली असता त्या चोरट्यांनी आजीचे कानातील सोन्याचे वेल व कुड्या या जबरदस्तीने ओढुन घेतल्या तसेच बाळाचे पायातील चांदीचे पैंजण देखील काढुन घेतले. तर फिर्यादी यांचे गळ्यातील मंगळसुत्र ओढण्याचा प्रयत्न करीत असतांना, घरातील इतर लोक जागे झाल्याने ते चोरटे तेथुन घराचे बाहेर रात्रीचे अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेले.

त्यावेळी मात्र फिर्यादी यांचे आई वडील आरडा ओरडा झाल्याने त्याचे जवळ आले असता त्यांना सर्व घडलेला प्रकार सांगीतला, त्यात आजीचे कानातील वेल व कुडया या चोरांनी ओरबडून नेल्या असलेबाबत सांगीतले. त्यानंतर आजीचे दोन्ही कानांतुन रक्त येत असल्याने तिला सरकारी दवाखाना बेल्हे येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारकामी मंचर येथे नेण्यास सांगीतले. त्यानंतर आजी हिराबाई हिस मंचर येथे नेवुन तिचेवर उपचार चालू केले. या चोरांचे झालेले झटापटीत फिर्यादी यांना डावे हाताला व गळ्याला मार लागला आहे.

दरम्यान चोरी करणारे दोन चोर अंदाजे 30 ते 35 वयाचे शरीर यष्टीने दनकट उंची अंदाजे पाच ते साडे पाच फुट, दोघांचे अंगामध्ये टी-शर्ट व काळसर रंगाच्या नाईट पॅन्ट असल्याचे फिर्यादी यांनी सांगितले. तर आजीचे कानातील 50,000/- रु सोन्याचे कानातील कुड्या व 1000/- रु. चे लहान बाळाचे पायातील चांदीचे पैंजण जोड असा एकूण 51,000 /- रु. किमतीचा ऐवज चोरून नेला आहे.

सदर घडलेल्या घटनेचा तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विश्वास जाधव यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर व त्यांचे सहकारी करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!