
आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी स्मशानभूमी जवळ असणारे कातकरी समाजाचे एक महिला आणि दोन पुरुष असे तीन जण घोडनदी पात्रात अडकले असल्याची माहिती.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – दिपाली खिरड
दरम्यान प्राथमिक मिळालेली माहिती अशी की, घोडेगाव या ठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमीत कातकरी समाजाचे पाच लोक रात्रीच्या वेळी झोपले होते. मात्र रात्री १०:४५ वाजताचे दरम्यान डिंभे धरण सांडव्यातून घोड नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. तरी पहाटे तीनच्या दरम्यान घोड नदी पात्रातील पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे तिथे झोपलेल्या लोकांना कळाल्याने त्यातील दोन लोकांना पोहता येत असल्यामुळे ते एका बाजूला पोहोत निघून गेले, तर तिघांना पोहता येत नसल्यामुळे ते त्याच ठिकाणी अडकले असल्याची कळाले.
त्यामध्ये एक महिला व दोन पुरुष असे लोक अडकल्याची माहिती मिळत आहे त्यापैकी दोन पुरुष स्मशानभूमीच्या पत्र्यावर बसलेले आहेत तर एक महिला जवळच असलेल्या झाडाच्या वर बसलेले असल्याचे दिसत असून स्थानिक सांगत आहेत.
सदरची घटना कळताच त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रशासनाचे अधिकारी घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सागर पवार यांच्यासह त्यांची सर्व टीम तर निसर्ग साहस संस्थेचे अध्यक्ष धनंजय कोकणे आणि त्यांचे सर्व सहकारी घटनेच्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी अडकलेले कातकरी समाजाचे लोकांचे बचाव कार्य सुरू आहे.
दरम्यान मंगळवार दिनांक १९/८/२५ रोजी रात्री १०:४५ मिनिटांने डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) सांडव्यातून घोड नदी पात्रात विसर्ग १३, ४००/- क्यूसिक करण्यात आला होता, याबाबत प्रशासनाने व्हाट्सअप मेसेज द्वारे नदीपात्राशेजारील गावातींल जनतेला कळविले होते.
तरी पावसाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने आणि डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) भरल्यामुळे त्यामधून रात्री मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीपात्रात किंवा नदी काठी कोणी जाऊ नये किंवा जनावरांना देखील जाऊ देऊ नये. यापुढे पावसाचा जोर वाढल्यास डिंभे धरणातून गोड नदी पात्रात केव्हाही मोठ्या जास्त प्रमाणात पाणी सोडण्यात येईल, त्यामुळे घोड नदीकाठच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी असे आव्हान पाटबंधारे विभाग आणि भाजपा उत्तर पुणे जिल्हा सचिव प्रमोद हरिभाऊ बाणखिले यांनी केले आहे.
व्हिडिओ बातम्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला सबस्क्राईब करा 👇👇


