
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाची संततदार चालू असल्याने ओढे नाले तलाव ओसंडून वाहू लागले आहेत, त्यातच डिंबे धरण हुतात्मा बाबू गेनू जलाशय यामधून पाण्याचा विसर्ग सोडला असल्याने नद्यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
त्यातच आज सकाळी घोडेगाव या ठिकाणी कातकरी समाजाचे तीन जण स्मशानभूमी ठिकाणी अडकल्याची माहिती मिळाली होती तर तर दुसरी घटना साल ठाकरवाडी येथे पती-पत्नी शेती कामावर येत असताना पाझर तलावामध्ये पाय घसरून पडल्याची घटना घडली आहे.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – दिपाली खिरड
मिळालेली माहिती अशी की, आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागातील इंगवलेवाडी या ठिकाणावरून देवराम सखाराम पारधी व त्यांची पत्नी हे सकाळी 10:00 च्या दरम्यान शेतमजुरीचे कामानिमित्त साल ठाकरवाडी या गावाकडे पाझर तलावाचे बंधाऱ्यावरून येत असताना पाय घसरून पाण्यात पडले असल्याची घटना घडली आहे.
मात्र देवराम पारधी यांच्या पत्नी पाय घसरून पाण्यात पडल्यानंतर जवळच असणाऱ्या एका दगडाचा आधार घेत त्या सुमारे एक तासभर एका दगडाला धरून होत्या. घटना घडल्यानंतर काही वेळातच दोन स्थानिक ठिकाणावरून जात असताना महिला दगडाला धरून असल्याचे दिसताच त्या दोन स्थानिक तरुणांनी त्या महिलेला पाण्यातून बाहेर काढण्यात या तरुणांना यश आले आहे. तसेच त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे.
देवराम पारधी हे पाण्यात पडल्यानंतर अद्याप पर्यंत मिळालेली नाही तर त्यांचे शोध कार्य सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

सदर घटना कळताच आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांच्यासह त्यांची रेस्क्यू टीम, तसेच निसर्ग साहस संस्था चे धनंजय कोकणे त्यांची संपूर्ण टीम आणि घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सागर पवार यांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून सदर देवराम पारधी यांचे शोध कार्य सुरू आहे.
दरम्यान घोडेगाव येथील स्मशानभूमी या ठिकाणी सकाळी पाण्याचा विसर्ग जास्त असल्यामुळे कातकरी समाजाची एक महिला व दोन पुरुष हे अडकल्याची माहिती मिळतात निसर्ग साहस संस्थेचे धनंजय कोकणे व त्यांची टीम यांनी सदर तीनही कातकरी समाजातील व्यक्तींना सुखरूप पणे रेस्क्यू करून पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. त्या ठिकाणी निसर्ग साहस संस्थेचे व प्रशासनाचे आभार देखील व्यक्त करण्यात आले.

संततदार पावसामुळे नदी नाले ओढे तलाव हे ओसंडून वाहत आहेत तसेच डिंभे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे तरी नदीकाठच्या जनतेला आंबेगाव तालुक्यातील प्रशासनाकडून वेळोवेळी सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तरी नदीकाठील लोकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, आणि सावधानता बाळगावी, तसेच काही घटना घडल्यास आपल्या जवळील पोलीस स्टेशन अथवा संबंधित प्रशासनाला संपर्क करण्याचे आवाहन तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांच्याकडून करण्यात येत आहे.
व्हिडिओ बातम्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा 👇


