जाहिरात

भूमी अभिलेख कार्यालयात लाच घेताना एक महिला अधिकारी व खाजगी सर्वेअर या दोघांना लाच घेताना पकडले रंगे हात ❗गुन्हा दाखल.

दौंड भूमी अभिलेख कार्यालयात लाच घेताना एक महिला अधिकारी आणि एक खाजगी सर्वेयरला लाचलूचपत विभागाच्या टीमने रंगेहात पकडले आहे. वैशाली चंद्रकांत धसकटे वय 49 वर्ष, व्यवसाय नोकरी पद परिरक्षण भूमापक, उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, दौंड रा. केडगाव स्टेशन ता. दौंड जि.पुणे (वर्ग-3) आणि फय्याज दाऊद शेख वय 27, खाजगी इसम सहाय्यक सर्व्हेयर, उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय, दौंड, रा.ठी. पानसरे वस्ती, दौंड जि. पुणे अशी या दोन आरोपींची नावे आहेत.

स्वराज्य संवाद प्रतिनिधी –

घटनेची मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदार हे शेतकरी असून त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा वाटपाचा दावा दौंड येथील दिवाणी न्यायालयात कोर्टात चालू होता त्या दाव्यामध्ये कोर्टाने तक्रारदाराच्या सामायिक जमिनीचा हिस्सा ठरवून मा. जिल्हाधिकारी यांना जमिनीचे वाटप करून घेण्याबाबत आदेशीत केल्यानंतर तहसीलदार, दौड यांनी उपाधीक्षक भूमी अभिलेख, दौंड यांना तक्रारदाराच्या सामायिक जमिनीची मोजणी करून वाटप तक्ता सादर करण्याकरता आदेशित केले होते.

त्याप्रमाणे सदर प्रकरण उपाधीक्षक भूमी अभिलेख, दौंड यांच्याकडे आल्यानंतर तक्रारदाराच्या सामायिक जमिनीची मोजणी यातील आरोपी लोकसेवक क्र 1 वैशाली चंद्रकांत धसकटे, यांनी केली होती.तदनंतर तक्रारदाराच्या सामायिक जमिनीची केलेल्या मोजणीचा अहवाल आणि वाटप तक्ता तयार करून उप अधीक्षक, भूमि अभिलेख दौड यांचे सही घेऊन तो प्रस्ताव तहसीलदार, दौंड यांना सादर करण्याकरता व तक्रारदारास ‘क’ प्रत देण्याकरिता यातील आरोपी लोकसेविका श्रीमती धसकटे यांनी तक्रारदाराकडे 15,000/- रुपयाची लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी दि.04/08/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडे केली होती.

तर तक्रारदाराच्या वरील तक्रारीच्या अनुषंगाने दि. 11/08/2005 रोजी पडताळणी कारवाई केली असता आरोपी क्र. 1 श्रीमती धसकटे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडे त्यांचे वरीलप्रमाणे काम करून देण्यासाठी सुरुवातीस 15,000/- रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 14,000/- रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.वरीलप्रमाणे लाच मागणी पडताळणी केल्यानंतर आज दिनांक 20/08/2025 रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी क्र.1 लोकसेवीका श्रीमती धसकटे यांचे सांगण्यावरून आरोपी क्र. 2 फय्याज दाऊद शेख, यांनी तक्रारदाराकडून त्यांच्या वरीलप्रमाणे कामासाठी उपाधीक्षक भूमी अभिलेख, दौंड यांच्या कार्यालयाच्या आवारात 10,000/- रुपयाची लाच स्विकारली असता दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तर वरील दोन्ही आरोपी लोकसेवक यांच्याविरुद्ध दौड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण या ठिकाणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक श्री. अजीत पाटील, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. लोकसेवक शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे (मो.क्र. 9823137154) तसेच अपर पोलीस अधीक्षक 1 श्री. अजीत पाटील, ला.प्र.वि., पुणे (मो.क्र. 9029030530) यांनी केले आहे.

व्हिडिओ बातम्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!