जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

आंबेगाव तालुक्यात अवैध मुरूम व गौण खनिज वाहतुकीला चाप ; दोन डंपर पकडले

आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी तहसीलदार डॉक्टर सचिन वाघ यांनी कडक कारवाई सुरू केली आहे.

स्वराज्य संवाद – प्रतिनिधी आंबेगाव

या बाबत सविस्तर माहिती अशी की, आंबेगाव तालुक्यात गौण खनिज वाहतूक प्रतिबंधकासाठी 6 मंडळ पथके नेमण्यात आली आहेत.

अश्यातच गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे घोडेगाव मधुन रात्रीचे वेळी दोन ढंपर हे अवैध माती व मुरूम घेऊन जात आहेत, त्यानंतर सदर दोन डंपर MH 14 MT 2412 व BR 01 GH 6467 हे स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल प्रशासनाचे अधिकारी यांनी सापळा रचून सदर डंपर पकडण्यात आले आहेत. या डंपरवर संयुक्त कारवाई करून दंडात्मक कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

“आवश्यक त्या सर्व कागपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधित वाहकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा आमचा मानस आहे,” असे तहसीलदार वाघ यांनी सांगितले.

तालुक्यातील सर्व मंडळाधिकारी व तलाठी यांना रात्री गस्त घालून अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्याचे आदेश दिले आहेत. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तहसीलदार सचिन वाघ यांचे आवाहन

“आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचे महसूलचे अधिकारी रात्रीच्या वेळी गस्त घालत आहेत. सोबत नागरिकांनीही सहकार्य करावे. अवैध गौण खनिज वाहतुकीची माहिती मिळाल्यास त्वरित गावचे तलाठी, मंडळ अधिकारी यांना कळवावे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!