जाहिरात

आंबेगाव तालुक्यात ट्रॅक्टर व आधुनिक शेती उपकरणांचे उद्घाटन

आंबेगाव तालुक्यातील पेसा गाव घोडेवाडी येथे ट्रॅक्टर व आधुनिक शेती उपकरणांचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळवाडी (जि. पुणे) येथे सोमवार दि. ९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता टाटा मोटर्स व आरोग्य महामंडळ यांच्या संयुक्त सहकार्यातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ट्रॅक्टर व विविध आधुनिक शेती उपकरणांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

प्रतिनिधी – विश्वजित गवारी

या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ट्रॅक्टर, रोटावेटर, फणी, भात मळणी यंत्र, भात कापणी यंत्र तसेच इतर शेतीसाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या सुविधेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार असून शेतीची कामे अधिक सुलभ, जलद व कमी खर्चात करण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमाला आरोग्य महामंडळाचे प्रतिनिधी म्हणून किशोर भोर, अनंता पारधी व माणिक सावंत यांच्या उपस्थितीत या शेती उपकरणांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजू घोडे यांनी केले, तर आभार गणेश भांगे यांनी केले.

या प्रसंगी राहुल शेळके (टाटा मोटर्स) तसेच सचिन इंदोरे यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. तसेच बोरघर पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती साधनांचा मोठा लाभ होणार असून गावाच्या शेती विकासासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!