
मंचर येथील एसटी स्टँड परिसरात एका ५५ ते ६० वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा बेशुद्ध अवस्थेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे आवाहन मंचर पोलिसांनी केले आहे.
मंचर प्रतिनिधी – विश्वजीत गवारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, दिनांक १३ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एसटी स्टँड परिसरात एक इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. सदर बेशुद्ध असलेल्या इसमास तातडीने उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
मयत इसमाचे वर्णन खालीलप्रमाणे
वय: अंदाजे ५५ ते ६० वर्षे
उंची: ५ फूट
बांधा: सडपातळ
रंग: काळा सावळा
चेहरा: कपाळ उभट आणि नाक सरळ
पोशाख: अंगात निळसर चेक्सचा हाफ बाह्यांचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट
सदर वर्णनाच्या व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास किंवा त्यांच्या नातेवाइकांबाबत काहीही माहिती मिळाल्यास तातडीने मंचर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
संपर्कासाठी मोबाईल क्रमांक:
श्रीकांत कंकाळ (पोलीस निरीक्षक): ९४२२४३२५५५
सनिल धनवे (पी.एस.आय.): ९८५००७८१००

