WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

पती-पत्नीच्या वादातून पत्नीने घातली डोक्यात काठी, पती जखमी तर पत्नीवर गुन्हा दाखल

‘तू कोणाच्या गाडीवर फिरतोस?’ असा साधा प्रश्न विचारल्याचा राग आल्याने मुलाने वडिलांना उद्धट उत्तर दिले. मुलाला ओरडल्याचा राग मनात धरून पत्नीने थेट पतीला शिवीगाळ करत लाकडी काठीने मारहाण केल्याची खळबळजनक घटना आंबेगाव तालुक्यातील साल गावी घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात पतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, घोडेगांव पोलीस ठाण्यात पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोडेगांव प्रतिनिधी – विश्वजित गवारी

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नथु गव्हाणे (रा. साल, ता. आंबेगाव, जि. पुणे) हे मंचर येथे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. फिर्यादी आणि त्यांची पत्नी आकांक्षा गव्हाणे यांच्यात घरगुती कारणांवरून सतत वाद होत असत मात्र दि.११ मे २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी हे आपल्या घराबाहेर ओट्यावर बसलेले होते. त्याच वेळी त्यांचा मोठा मुलगा अभिनव हा गावातील एका व्यक्तीच्या दुचाकीवरून घरी आला.

फिर्यादी यांनी मुलाला काळजीपोटी विचारले, “तू त्या व्यक्तीसोबत कुठे गेला होतास?” या साध्या प्रश्नावर मुलाने अत्यंत उद्धटपणे उत्तर दिले की, “मी माझ्या मनाचा मालक आहे, तू कोण मला विचारणारा?” मुलाच्या या वर्तनामुळे फिर्यादी त्याला रागावले. मुलाला ओरडलेले पाहून ओट्यावर बसलेली फिर्यादी यांची पत्नी आकांक्षा हिचा पारा चढला. आरोपी पत्नी फिर्यादी पतीला म्हणाले की, “आम्हाला विचारणारा तू कोण?” असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.

दोघांमधील हा शाब्दिक वाद एवढा वाढला की, आरोपी पत्नीने रागाच्या भरात घराबाहेर पडलेली एक लाकडी काठी उचलली आणि थेट फिर्यादी यांच्या डोक्यात मारली. तर फिर्यादी पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी पत्नी म्हणाली, “तू कसा काय जगतो ? तुझे आई-बाप मेल्यानंतर तुझ्याकडे बघते”.

या दरम्यान झालेला गोंधळ ऐकून शेजारी राहणाऱ्या महिलेने तातडीने धाव घेत मध्यस्थी केली आणि भांडण सोडवले, तर काही वेळातच फिर्यादी यांचे आई-वडील तेथे पोहोचले. त्यांनी जखमी फिर्यादी यांना तातडीने घोडेगांव पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी जखमीची अवस्था पाहून सर्वप्रथम उपचारासाठी वैद्यकीय चिठ्ठी देऊन रुग्णालयात पाठवले. रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी अधिकृतपणे तक्रार नोंदवून घेतली.

घोडेगांव पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पत्नी आकांक्षा आनंद गव्हाणे हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ११५(२) (इच्छापूर्वक दुखापत करणे), ११८(२) (घातक शस्त्राने दुखापत करणे), ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) आणि ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश गवारी करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!