1782234614371

लग्नाचा बाजार ! नवरी आणि टोळीविरुद्ध गुन्हा दाखल; तोतया नवरीच्या गँगचा पर्दाफाश

लग्नासाठी मुलगी शोधत असलेल्या एका तरुणाला बनावट लग्नाच्या जाळ्यात अडकवून तब्बल १ लाख ६० हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार आळेफाटा येथे उघडकीस आला आहे. याप्रकारणी फिर्यादी तरुणाच्या तक्रारीवरून आळेफाटा पोलिसांनी महिला एजंटसह चार आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिनिधी – विश्वजित गवारी

एजंटच्या मध्यस्थीने ठरले लग्न

मिळालेल्या आणि गुन्हा दाखल केलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अविवाहित असून त्यांच्या लग्नासाठी मुलगी शोधणे सुरू होते. त्यांचे मित्र यांच्या ओळखीने आळेफाटा (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील महिला एजंट संगीता शिंदे हिच्याशी संपर्क साधण्यात आला. एजंट संगीता शिंदे हिने लग्न जमवून देण्यासाठी २ लाख ३० हजार रुपयांची मागणी केली होती.

घरातच लावले लग्न, पैसे घेताच नवरी पळाली

दिनांक २० जून २०२६ रोजी दुपारी फिर्यादी हे आपल्या नातेवाईकांसह आळेफाटा येथे आले. तेथे आरोपी संगीता शिंदे हिने राधा रमेश काळे (रा. जालना) हिच्याशी फिर्यादीची भेट घडवून आणली आणि घरातच गळ्यात माळ घालून त्यांचे लग्न लावून दिले. त्यानंतर फिर्यादीकडून १ लाख ५० हजार रुपये रोख आणि १० हजार रुपये फोनपे द्वारे असे एकूण १ लाख ६० हजार रुपये आरोपींनी उकळले. लग्न उरकून फिर्यादी नवरीला घेऊन आपल्या गावी परतले.

असा उघड झाला डाव

दुसऱ्या दिवशी, २१ जून रोजी फिर्यादी यांनी राहत्या गावी मंदिरात रितीरिवाजाप्रमाणे पुन्हा लग्न लावले. संध्याकाळी घराबाहेर एक संशयास्पद पांढऱ्या रंगाची कार उभी असलेली दिसली. कार पाहताच नवरी (आरोपी राधा काळे) ही त्या गाडीकडे पळू लागली. फिर्यादीच्या नातेवाईकांनी हटकले असता ती कार तेथून वेगाने पळून गेली. यानंतर फिर्यादी यांनी नवरीकडे कसून चौकशी केली असता, तिने सांगितले की ती आळेफाटा येथील एजंट संगीता शिंदे हिच्याकडून पैशांचा हिस्सा घेऊन पळून जाणार होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.

आरोपींची नावे आणि पुढील कारवाई
या गुन्ह्यात पोलिसांनी अमोल ज्ञानदेव पिंजारी (रा. गोंडेगाव,श्रीरामपूर), संगीता शिंदे (महिला एजंट, रा.आळे, जुन्नर), सोनाली मोहन भोसले (रा. परतूर, जालना), राधा रमेश काळे (नवरी, रा. देवमूर्ती, जालना) या चार आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. तर आळेफाटा पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३(५), ३१८(४) आणि ४९ अन्वये फसवणूक व कट रचल्याचा गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल पानहळकर हे करत आहेत.

👇🏻 व्हिडिओ 👇🏻 न्यूज 👇🏻 पाहण्यासाठी 👇🏻

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments