
दिपावलीनिमित्त भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या साखरेच्या धोरणात यंदा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, कारखान्याचे संस्थापक आणि राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार आणि शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली आहे.
प्रतिनिधी – दिपाली खिरड
यंदाच्या बदललेल्या धोरणानुसार, कारखान्याचे भागधारक आणि गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे साखरेचे वाटप केले जाईल.
📊 साखरेचे नवीन वाटप धोरण
• ८० किलो साखर: पूर्ण व अपूर्ण शेअर्स रक्कम जमा केलेले आणि ऊस पुरवठा केलेले शेतकरी.
• ६० किलो साखर: फक्त पूर्ण शेअर्स (रु. १५,०००/-) रक्कम जमा केलेले सभासद.
• ६० किलो साखर: फक्त ऊस पुरवठा केलेले शेतकरी.
• ५० किलो साखर: अपूर्ण शेअर्स रक्कम जमा केलेले सभासद.
सदर साखर गावोगावी १०, २० आणि ५० किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध करून दिली जाणार असून हे धोरण केवळ चालू वर्षापुरतेच मर्यादित असेल.
गाववार साखर वाटपाचे सविस्तर वेळापत्रक (६ ते १५ ऑक्टोबर २०२६)
पारगाव, निरगुडसर, जांबूत, कळंब, रांजणी आणि मंचर गटातील गावांमध्ये यापूर्वीच प्राथमिक वाटप झाले आहे. आता पुढील टप्प्याचे नियोजन खालीलप्रमाणे आहे:
• मंगळवार, ६ ऑक्टोबर: घोडेगाव गटातील सर्व गावे.
• बुधवार, ७ ऑक्टोबर: टाकळी हाजी, कवठे आणि करंदी गटातील सर्व गावे.
• गुरुवार, ८ ऑक्टोबर: करंदी गटातील गावांसाठी ‘गट ऑफिस’ येथे.
• शुक्रवार, ९ ऑक्टोबर: जातेगाव, भोरवाडी, निमगाव सावा, नारायणगाव गट, ओझर, उंब्रज या गटातील गावांसाठी ‘गट ऑफिस’ येथे; तसेच खोडद व पारगाव (मंगरूळ) गाव येथे.
• शनिवार, १० ऑक्टोबर: जातेगाव बु||, भोरवाडी, निमगाव सावा, नारायणगाव अंतर्गत संबंधित गावासांठी ‘गट ऑफिस’ येथे आणि खेड गटातील गावांसाठी ‘मार्केट यार्ड खेड’ येथे.
• रविवार, ११ ऑक्टोबर: पारगाव गटातील सर्व गावे.
• मंगळवार, १३ ऑक्टोबर: पारगाव गाव, निरगुडसर आणि जांबूत गटातील सर्व गावे.
• बुधवार, १४ ऑक्टोबर: निरगुडसर गाव, कळंब आणि रांजणी गटातील सर्व गावे.
• गुरुवार, १५ ऑक्टोबर: मंचर गटातील सर्व गावे.
🏭 कारखाना साईटवर साखर कधी मिळणार?
जे शेतकरी किंवा सभासद आपल्या गावात निश्चित केलेल्या तारखेला साखर घेऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी कारखाना साईटवर स्वतंत्र सोय करण्यात आली आहे:
- पहिला टप्पा: १६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत (गुरुवार व शासकीय सुट्ट्या वगळून).
- दुसरा टप्पा: उर्वरित सभासदांना सप्टेंबर २०२७ पर्यंत कारखाना साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत (गुरुवार व शासकीय सुट्ट्या वगळून) साखर घेता येईल.
⚠️ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आणि आवाहन
- स्मार्ट कार्ड आणि ओळखपत्र आवश्यक: निर्धारित तारखेला साखर घेण्यासाठी येताना शेतकऱ्यांनी कारखान्याने दिलेले स्मार्ट कार्ड आणि स्वतःचे ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.
- शेअर्सची रक्कम पूर्ण करा: कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी आवाहन केले आहे की, सर्व शेअर्स धारकांनी आपल्या शेअर्सची अपूर्ण रक्कम कारखान्याकडे त्वरित जमा करावी; अन्यथा पुढील वर्षी धोरणामध्ये बदल करावा लागेल.


