जाहिरात गवारी

बैलपोळा सणासाठी गावी जाणाऱ्या महिलेचे पावणेदोन लाखांचे दागिने प्रवासात लंपास; मंचर पोलिसांत गुन्हा दाखल

बैलपोळा सणासाठी आपल्या मूळ गावी जाणाऱ्या एका विवाहित महिलेच्या पर्समधून सुमारे १,९४,५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वर्षा सोमनाथ जैद रा. पेठ पारगाव, ता. आंबेगाव यांनी मंचर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रतिनिधी – विश्वजित गवारी

गुन्हा दाखल केलेल्या आणि मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जैद या १० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास बैलपोळा सण साजरा करण्यासाठी आपल्या मुलासह नाणेकरवाडी येथून निघाल्या होत्या. चाकण तळेगाव चौकातून रिक्षाने त्या खेडपर्यंत आल्या आणि त्यानंतर दुसऱ्या रिक्षाने खेड येथील युवराज हॉटेल पाशी उतरून पायी आपल्या पेठ पारगाव येथील मूळ घरी गेल्या.

रात्री ७:३० वाजता बैलपूजनाची तयारी करत असताना, त्यांनी दागिने घालण्यासाठी पर्स उघडली असता त्यांना धक्काच बसला. पर्समधील सोन्याचे सर्व दागिने गायब होते. चाकण तळेगाव चौक बस स्टॉप ते पेठ पारगाव दरम्यानच्या प्रवासात कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा किंवा नजरचुकीचा फायदा घेऊन पर्समधील दागिने लांबवल्याची त्यांची खात्री झाली.

चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचा राणी हार, दोन पदरी मणीमंगळसूत्र, सोन्याची अंगठी, कानातील सोन्याचे वेल, हान मुलाच्या गळ्यातील सोन्याचे बदाम लॉकेट व कानातील रिंगा असे दागिने होते.

या घटनेनंतर वर्षा जैद यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकरी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक संदीप बबन करभळ करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Most Popular

Recent Comments